IND vs AUS  2nd T20I Live Streaming :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (MCG) खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पण या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल ही जोडी फॉर्ममध्ये परतल्याचे पाहायला मिळाले. उर्वरित चार सामन्यातही ते कामगिरीतील सातत्य कायम राखतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय अभिषेक शर्मा  आणि तिलक वर्माच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असतील. इथं एक नजर टाकुयात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना कधी अन् कुठं रंगणार? हा सामना कसा पाहता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती  
 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
IND vs AUS दुसरा टी-२० सामना
- सामन्याची तारीख : ३१ ऑक्टोबर २०२५ (शुक्रवार)
- सामन्याचे ठिकाण : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न
- सामन्याची वेळ: दुपारी १.४५ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
 
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
 भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Team India Probable XI)
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा.
ऑस्ट्रेलियन संघाची प्लेइंग इलेव्हन (Australia  Probable XI)
ट्रॅविस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), मार्कस स्टोयनिस, टीम डेविड, मिच ओवेन, जोश फिलिप, नॅथन एलिस, झेवियर बार्टलेट, मॅथ्यू क्यूनमन, जोश हेजलवूड.
सामना कुठं पाहता येईल?
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील सर्व सामने जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहेत.
- या मालिकेतील सामन्यांच्या प्रसारणाचे सर्व  हक्क स्टार नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येईल.
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० क्रिकेटमधील हेड टू हेड रेकॉर्ड
- दोन्ही संघातील एकूण T20I सामने- ३४
- भारत विजयी -२०
- ऑस्ट्रेलिया विजयी- ११
-  अनिर्णित : २
-  पावसामुळे रद्द झालेला सामना: १
 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका
- पहिला सामना- २९ ऑक्टोबर: पहिला टी-२०, मनुका ओव्हल, कॅनबेरा – दुपारी १:४५ (पावसामुळे रद्द)
- दुसरा सामना- ३१ ऑक्टोबर: दुसरा टी-२०, मेलबर्न – दुपारी १:४५
- तिसरा सामना- २ नोव्हेंबर: तिसरा टी-२०, हॉबार्ट – दुपारी १:४५
- चौथा सामना-  ६ नोव्हेंबर: चौथा टी-२०, गोल्ड कोस्ट – दुपारी १:४५
- पाचवा सामना - ८ नोव्हेंबर: पाचवा टी-२०, गॅबा, ब्रिस्बेन – दुपारी १:४५