India vs Afghanistan 1st T20I: भारतीय संघ अफगाणिस्तान विरुद्ध प्रथमच टी-२० मालिका खेळणार असून मायदेशातल्या या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आय.एस.बिंद्रा स्टेडियमवर आज सायंकाळी रंगणार आहे.
मोहालीत थंडीचा कडाका पाहायला मिळत आहे. भारतीय खेळाडूंनाही थंडीत खेळणे कठीण होत आहे. सराव सत्रादरम्यान सर्व खेळाडूंना थंडीचा त्रास होताना दिसला. बीसीसीआयने आज (११ जानेवारी) सामन्याच्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सर्व खेळाडूंनी आपले थंडीबाबतचे अनुभव सांगितले.
थंडी पाहून आवेश खान यांना दिवंगत कवी राहत इंदोरी यांची आठवण झाली. आवेशने "अगर खिलाफ है होना दो, जान थोडी है, ये सब दुआं है कोई आसमान थोडी है" ही त्यांची प्रसिद्ध कविता त्याच्या स्वतःच्या शैलीत वाचली. कुलदीप यादव म्हणाला की, अशा थंडीत फिरकी गोलंदाजांना आव्हानांचा सामना करावा लागेल. शिवम दुबे म्हणाला, "या हवामानात क्रिकेट खेळणे आव्हानात्मक असेल, पण मजा येईल." त्याचवेळी राहुल द्रविडला बंगळुरूची आठवण झाली. तो म्हणाला, "खूप थंडी आहे. बंगळुरूमध्ये खूप छान आहे."
पाहा व्हिडीओ-
भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान संघ- इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमतुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह झाझाई, इब्राहिम अलिखिल, रहमत शाह, मोहम्मद नबी, एन. झादरान, के. जनात, ए. ओमरजाई, एस. अश्रफ, एम. रहमान, एफ. फारुखी, एफ. मलिक, नवीन उल हक, एन. अहमद, एम. सालेम, क्यू अहमद, गुलबदीन नईब, राशिद खान.
IND vs AFG TimeTable
११ जानेवारी - मोहाली, सायंकाळी ७ वाजल्यापासून
१४ जानेवारी - इंदौर, सायंकाळी ७ वाजल्यापासून
१७ जानेवारी - बंगळुरू, सायंकाळी ७ वाजल्यापासून