साऊदम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान : वर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले. मुजीब उर रहमानच्या कॅरम बॉलवर रोहितचा त्रिफळा उडाला. डावाच्या पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रहमानने अप्रतिम चेंडू टाकून रोहितला अवघ्या एका धावेवर माघारी पाठवले. या विकेटसह रोहितने आपल्या नावावर नकोस विक्रम नोंदवला. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकीपटूंना भारतीय फलंदाजांना बाद करता आलेले नाही, परंतु अफगाणिस्तानच्या रहमानने ती कामगिरी करून दाखवली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये फिरकीपटूकडून बाद होणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India Vs Afghanistan Latest : रोहित शर्मानं मिळवला नकोसा मान; अफगाणिस्तानच्या फिरकीची कमाल
India Vs Afghanistan Latest : रोहित शर्मानं मिळवला नकोसा मान; अफगाणिस्तानच्या फिरकीची कमाल
वर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 16:24 IST