Join us

India Tour of Sri Lanka : दुय्यम संघ पाठवून आमच्या देशाचा अपमान केलाय; श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची टीका

India Tour of Sri Lanka : एकाच वेळी दोन भारतीय संघ दोन वेगवेगळ्या दौऱ्यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दुसरी फळी श्रीलंकेत दाखल झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 13:48 IST

Open in App

India Tour of Sri Lanka : एकाच वेळी दोन भारतीय संघ दोन वेगवेगळ्या दौऱ्यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दुसरी फळी श्रीलंकेत दाखल झाली आहे. महान फलंदाज राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण, भारतानं पाठवलेल्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंच्या संघावर नाराजी व्यक्त केली असून हा आमच्या देशाचा अपमान असल्याची टीका श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यानं केली. ( Sri Lanka legend Arjuna Ranatunga, hosting a 'second-string' Indian team for an international series is 'insulting')  

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रिषभ पंत, इत्यादी प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यावर काही प्रमुख खेळाडूंसह दुसऱ्या फळीतील खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका क्रिकेट बोर्डानंही ते मान्य केले आणि त्यावरून रुणतुंगा यानं लंकन क्रिकेट बोर्डावरही टीका केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं या मालिकेचं आयोजन करण्यास नकार द्यायला हवा होता, असे मत रणतुंगानं व्यक्त केले.

Tokyo Olympics : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ११७ भारतीय घेणार सहभाग; महाराष्ट्राच्या राही, अविनाश, तेजस्वीनी अन् प्रवीणकडून पदकाची आस!

''हा टीम इंडियाचा दुसऱ्या फळीचा संघ आहे आणि ते इथे आमचा अपमान करण्यासाठी आले आहेत.  टेलिव्हिजन मार्केटींगसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डानं या मालिकेला मान्यता दिली, त्यावरून  मी त्यांच्यावर टीका केली,''असे रणतुंगानं सांगितले. भारत-श्रीलंका मालिका २०२०च्या सुरुवातीला होणार होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे ही मालिका स्थगित करण्यात आली. आता जुलै महिन्यात ही मालिका आयोजित करण्याचे बीसीसीआयनं ठरवले.

''भारतानं त्यांचा सर्वोत्तम संघ इंग्लंड दौऱ्यावर पाठवला आहे आणि श्रीलंकेसोबत खेळण्यासाठी दुय्यम संघ पाठवला आहे. त्यासाठी मी श्रीलंका बोर्डावरही टीका केली आहे,''असे रणतुंगा यानं सांगितले. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाला ट्वेंटी-२० मालिकेपाठोपाठ वन डे मालिकेतही सपाटून मार खावा लागला आहे.  

भारतीय संघ  - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीयानेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग 

स्पर्धेचे वेळापत्रक

वन डे मालिका - 13, 16 व 18 जुलै, कोलंबो

ट्वेंटी-20 मालिका - 21, 23 व 25 जुलै, कोलंबो

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाशिखर धवनराहूल द्रविड