Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, स्टार खेळाडूची संघात एन्ट्री!

क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार असून यामध्ये टी-२०, वनडे आणि एका कसोटी सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:28 IST

Open in App

भारतीय क्रिकेट महिला निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये स्टार खेळाडूंचा समावेश आहे. पायाच्या दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर असलेली स्टार सलामीवीर प्रतीका रावल देखील संघात परतली आहे. प्रतिकाला विश्वचषकादरम्यान दुखापत झाली आणि तेव्हापासून ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दूर आहे. परंतु, आता ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून मैदानात पुनरागमन करेल. या दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-२० संघात तिचा समावेश नव्हता. प्रतिका आणि शेफालीपैकी कोणाला कसोटीत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळते? हे पाहणे बाकी आहे.

भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ टी-२०, ३ एकदिवसीय सामना आणि एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा दौरा फेब्रुवारीच्या मध्यात सुरू होईल. मालिकेची सुरुवात तीन टी-२० सामन्यांनी होईल आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांसह होईल. शेवटी पर्थ मैदानावर ६ ते ९ मार्च दरम्यान एकमेव कसोटी सामना खेळला जाईल. या सामन्यात हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करेल, तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. 

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

सामनातारीखठिकाणवेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
पहिला टी-२० सामना१५ फेब्रुवारी, २०२६सिडनीदुपारी १:३० वा.
दुसरा टी-२० सामना१९ फेब्रुवारी, २०२६कॅनबरादुपारी १:३० वा.
तिसरा टी-२० सामना२१ फेब्रुवारी, २०२६ॲडलेडदुपारी २:०० वा.
पहिला एकदिवसीय सामना२४ फेब्रुवारी, २०२६ब्रिस्बेनसकाळी ९:०० वा.
दुसरा एकदिवसीय सामना२७ फेब्रुवारी, २०२६होबार्टसकाळी ९:०० वा.
तिसरा एकदिवसीय सामना१ मार्च, २०२६होबार्टसकाळी ९:०० वा.
कसोटी सामना६ - ९ मार्च, २०२६पर्थसकाळी ११:०० वा.

 ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा कसोटी संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, अमनजोत कौर, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री, प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका रावल, स्मृती, कृष्णा, कृष्णा, रेणुका शर्मा, सायली सातघरे.

English
हिंदी सारांश
Web Title : India's Squad Announced for Australia Test, Star Player Returns!

Web Summary : India announced its squad for the Australia Test, featuring the return of star player Pratika Rawal after injury. Harmanpreet Kaur will captain the team, with Smriti Mandhana as vice-captain. The tour includes T20s, ODIs, and a Test match in Perth.
टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाहरनमप्रीत कौरस्मृती मानधना