भारतीय क्रिकेट महिला निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये स्टार खेळाडूंचा समावेश आहे. पायाच्या दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर असलेली स्टार सलामीवीर प्रतीका रावल देखील संघात परतली आहे. प्रतिकाला विश्वचषकादरम्यान दुखापत झाली आणि तेव्हापासून ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दूर आहे. परंतु, आता ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून मैदानात पुनरागमन करेल. या दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-२० संघात तिचा समावेश नव्हता. प्रतिका आणि शेफालीपैकी कोणाला कसोटीत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळते? हे पाहणे बाकी आहे.
भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ टी-२०, ३ एकदिवसीय सामना आणि एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा दौरा फेब्रुवारीच्या मध्यात सुरू होईल. मालिकेची सुरुवात तीन टी-२० सामन्यांनी होईल आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांसह होईल. शेवटी पर्थ मैदानावर ६ ते ९ मार्च दरम्यान एकमेव कसोटी सामना खेळला जाईल. या सामन्यात हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करेल, तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
| सामना | तारीख | ठिकाण | वेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार) |
| पहिला टी-२० सामना | १५ फेब्रुवारी, २०२६ | सिडनी | दुपारी १:३० वा. |
| दुसरा टी-२० सामना | १९ फेब्रुवारी, २०२६ | कॅनबरा | दुपारी १:३० वा. |
| तिसरा टी-२० सामना | २१ फेब्रुवारी, २०२६ | ॲडलेड | दुपारी २:०० वा. |
| पहिला एकदिवसीय सामना | २४ फेब्रुवारी, २०२६ | ब्रिस्बेन | सकाळी ९:०० वा. |
| दुसरा एकदिवसीय सामना | २७ फेब्रुवारी, २०२६ | होबार्ट | सकाळी ९:०० वा. |
| तिसरा एकदिवसीय सामना | १ मार्च, २०२६ | होबार्ट | सकाळी ९:०० वा. |
| कसोटी सामना | ६ - ९ मार्च, २०२६ | पर्थ | सकाळी ११:०० वा. |
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा कसोटी संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, अमनजोत कौर, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री, प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका रावल, स्मृती, कृष्णा, कृष्णा, रेणुका शर्मा, सायली सातघरे.