Shubman Gill ICC Men's Player of the Month for July 2025 :इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना शुबमन गिलनं विक्रमांची अक्षरश: बरसात केली. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी झालेल्या कसोटी मालिकेत पिछाडीवर असताना गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ५ कसोटी सामन्यांची मालिकेत २-२ बरोबरी साधली. या मालिकेत शुबमन गिलच्या भात्यातून सर्वाधिक धावा निघाल्या. आता इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या भारतीय कॅप्टनला ICC कडून मोठ गिफ्ट मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेकडून जुलै महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या रुपात शुबमन गिलची निवड करण्यात आलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गिलनं इग्लिश कॅप्टन बेन स्टोक्ससह या पठ्ठ्याला दिली धोपीपछाड
आयसीसीकडून दिल्या जाणाऱ्या जुलै महिन्यातील पुरस्कारासाठी शुबमन गिलसह इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर या तिघांमध्ये स्पर्धा होती. बेन स्टोक्सनं टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करताना एका शतकासह १७ विकेट्स घेतल्या होत्या. दुसरीकडे वियान मुल्डर याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला WTC चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. पण गिलनं या दोघांना धोबीपछाड देत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
पुन्हा गिलचा दबदबा; चौथ्यांदा मारली बाजी
शुबमन गिलनं इंग्लंड दौऱ्यावर जुलैमध्ये खेळवण्यात आलेल्या ३ कसोटी सामन्यात एका द्विशतकासह ५६७ धावा कुटल्या. यात एका शतकाचाही समावेश आहे. ६ डावात त्याने ९४.५० च्या सरासरीसह या धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा त्याने आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारावर कब्जा केला. याआधी २०२३ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये त्याने हा पुरस्कार पटकवला होता.
Web Title: India Test captain Shubman Gill ICC Men's Player of the Month for July 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.