Join us

भारत- श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक बदलले, पहिला वन डे आता १७ जुलै रोजी

ही मालिका आता १३ ऐवजी १७ जुलैपासून सुरू होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य या गोष्टी लक्षात घेत एसएलसीसोबत सल्लामसलत केल्यानंतर मालिका चार दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सूत्रांनी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 09:14 IST

Open in App

नवी दिल्ली : श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचे मर्यादित सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक शुक्रवारी बदलण्यात आले. कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे यजमान संघात अस्वस्थता पसरली. फलंदाजी कोच आणि सहयोगी स्टाफ पॉझिटिव्ह आल्यानंतर आता पहिला सामना १३ जुलैऐवजी १७ जुलै रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.ही मालिका आता १३ ऐवजी १७ जुलैपासून सुरू होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य या गोष्टी लक्षात घेत एसएलसीसोबत सल्लामसलत केल्यानंतर मालिका चार दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सूत्रांनी दिली.   जे वन डे सामने आधी १३, १६ आणि १९ जुलै रोजी होणार होते ते आता १७ नंतरच्या तारखांना होतील.

डाटा विश्लेषक पाॅझिटिव्हफलंदाजी कोच आणि डाटा विश्लेषक जीटी निरोशन यांचा अहवाल पाॅझिटिव्ह येताच दोघांना अन्य खेळाडूंपासून वेगळे करण्यात आले. दोघांवरही कोरोना प्रोटोकॉलनुसार उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघभारतश्रीलंका