Join us

Breaking - रोहित शर्मा १४ महिन्यानंतर पुन्हा कर्णधारपदावर, अफगाणिस्तानविरुद्ध संघ जाहीर; विराटचं काय?

India squad announcement for Afghanistan series-  रोहित शर्मा आणि विराट कोहली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर आतरराष्ट्री ट्वेंटी-२० मॅच खेळलेले नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 19:15 IST

Open in App

India squad announcement for Afghanistan series-  रोहित शर्मा आणि विराट कोहली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर आतरराष्ट्री ट्वेंटी-२० मॅच खेळलेले नाहीत. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी त्यांचे पुनरागमन झाले आहे. रोहित शर्माकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व १४ महिन्यानंतर पुन्हा आले आहे. हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यादव यांना दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागले आहे. ऋतुराज गायकवाडही याच कारणामुळे ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नाही.

इशान किशनला या मालिकेतून डच्चू दिला गेल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. संजू सॅमसन व जितेश शर्मा हे दोन यष्टिरक्षक-फलंदाज संघात आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना इशानने BCCI कडे विश्रांतीची मागणी केली होती आणि त्याला रिलिज केले गेले होते. पण, अफगाणिस्तानविरुद्ध त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. रोहित व विराट यांना ट्वेंटी-२०त पुनरागमनाची संधी देण्याची निवड समिती व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मागणी BCCI ला मान्य करावी लागल्याचे, या संघावरून दिसले आहे. त्यामुळे या सीनियर खेळाडूंच्या कामगिरीवर आता सर्वांच्या नजरा असणार आहेत.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप १ जूपासून सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची ट्वेंटी-२० मालिका आहे. त्यानंतर आयपीएल २०२४ मध्ये या सर्व खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समिती लक्ष ठेवून असणार आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे. इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार. ( Rohit Sharma (C), S Gill, Y Jaiswal, Virat Kohli, Tilak Varma, Rinku Singh, Jitesh Sharma (wk), Sanju Samson (wk), Shivam Dube, W Sundar, Axar Patel, Ravi Bishnoi, Kuldeep Yadav, Arshdeep Singh, Avesh Khan, Mukesh Kumar) 

IND vs AFG TimeTable

११ जानेवारी - मोहाली, सायंकाळी ७ वाजल्यापासून१४ जानेवारी - इंदौर, सायंकाळी ७ वाजल्यापासून१७ जानेवारी - बंगळुरू, सायंकाळी ७ वाजल्यापासून 

अफगाणिस्तान - इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमतुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह झाझाई, इब्राहिम अलिखिल, रहमत शाह, मोहम्मद नबी, एन. झादरान, के. जनात, ए. ओमरजाई, एस. अश्रफ, एम. रहमान, एफ. फारुखी, एफ. मलिक, नवीन उल हक, एन. अहमद, एम. सालेम, क्यू अहमद, गुलबदीन नईब, राशिद खान.  

 

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीभारतअफगाणिस्तान