Join us

IND vs SA T20I Series : हार्दिक पांड्याचे पुनरागमन, उम्रान मलिक व दिनेश कार्तिकला मिळेल का संधी?; जाणून पहिल्या सामन्यासाठी भारताची Playing XI

India Playing XI vs South Africa T20I : दक्षिण आफ्रिके विरुद्धेच्या मालिकेतून हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन होत आहे, तर उम्रान मलिक याला पदार्पणाची कॅप मिळण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 16:53 IST

Open in App

India Playing XI vs South Africa T20I : रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिल्यामुळे कर्णधार लोकेश राहुल व प्रशिक्षक राहुल द्रविड यांना पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यांत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेतून हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन होत आहे, तर उम्रान मलिक याला पदार्पणाची कॅप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे.

टीम इंडियासमोरील प्रश्न 

 

  • लोकेश राहुलसह उद्याच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेपूर्वी ऋतुराजच्या मनगटाला दुखापत झाली होती आणि त्याला माघार घ्यावी लागली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋतुराज सलामीला खेळला तर इशान किशनला तिसऱ्या आणि श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागेल.
  • उम्रान-आवेश-अर्षदीप यापैकी तिसऱ्या जलदगती गोलंदाजासाठी एकाची निवड होणार आहे. भुवनेश्वर कुमार व हर्षल पटेल हे दोन जलदगती गोलंदाज संघात पक्के आहेत. राहुल द्रविडच्या मते उम्रान मलिक अजून परिपक्व झालेला नाही. त्यामुळे आवेश किंवा अर्षदीप यांच्यापैकी एकाला संधी नक्की मिळेल. 
  • हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. दिनेश कार्तिकला फिनिशरची जबाबदारी देण्याची शक्यता आहे, परंतु सध्याच्या कॉम्बिनेशननुसार त्याला अंतिम 11मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. जर एक गोलंदाज कमी खेळवण्याचा निर्णय झाल्यास दिनेश कार्तिकला संधी मिळू शकते.   

पहिल्या सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन  

  1. लोकेश राहुल ( कर्णधार)
  2. ऋतुराज गायकवाड
  3. इशान किशन
  4. श्रेयस अय्यर
  5. रिषभ पंत ( यष्टिरक्षक, उपकर्णधार)
  6. हार्दिक पांड्या
  7. अक्षर पटेल
  8. भुवनेश्वर कुमार
  9. हर्षल पटेल
  10. आवेश खान/अर्षदीप सिंग
  11. युजवेंद्र चहल
टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाराहुल द्रविडलोकेश राहुलहार्दिक पांड्यादिनेश कार्तिक
Open in App