दुबई - क्रिकेट विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी, भारत आणि पाकिस्तान, यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना केवळ मैदानापुरता मर्यादित राहिला नाही. या सामन्याच्या जय-पराजयपलीकडील घडामोडींनी एक नवीन वाद निर्माण केला आहे. अंतिम सामन्याच्या पारितोषिक वितरण सोहळ्यावर आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवपाकिस्तानी क्रिकेट संघाचे आणि आशियाई क्रिकेट काऊंसिलची अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार का, असा प्रश्न चर्चेत आला आहे.
आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11
नकवी हे पाकिस्तानचे मंत्री देखील आहेत. तसेच एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्षही आहेत. नकवी यांच्यामुळे आणि भारतीय संघाने घेतलेल्या पाकिस्तानी खेळाडूंशी 'नो हँडशेक' धोरणामुळे आता फायनलमध्ये काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार का, हा प्रश्न आता चर्चेत आहे. नकवी यांनी यापूर्वी भारतीय कर्णधाराविरुद्ध ICC कडे तक्रार केली होती. त्यांनी सूर्यकुमार यादववर बंदी घालण्याची मागणी केली होती. १४ सप्टेंबरच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवने भारतीय सैन्याला आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना तो विजय समर्पित केला होता, ज्यामुळे नकवी यांनी आक्षेप घेतला होता.
यापूर्वीच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सामन्यानंतर एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही, ज्यामुळे वातावरण आणखी तणावपूर्ण बनले आहे. आता हा अंतिम सामना केवळ क्रिकेटचा नसून, दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि राजकीय तणावाचा एक भाग बनला आहे. बीसीसीआय (BCCI) यावर कोणती भूमिका घेते आणि अंतिम सामन्यातील पारितोषिक वितरण सोहळा कसा पार पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सुर्यकुमारचा एसीसीला निरोप...
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, यादव याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारू नये अशी औपचारिक विनंती केली आहे. जर संघ अंतिम सामन्यात विजयी झाला तर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष नक्वी यांनी आशियाई कप ट्रॉफी भारताला देऊ नये असे वाटत आहे. हा संदेश एसीसीलाही देण्यात आला आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.