युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना

India Pakistan Conflict: काल पाकिस्तानने भारताच्या हद्दीत ड्रोनच्या माध्यमातून मोठ्या प्राणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सध्या सुरू असलेल्या आयपीएलला काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. भारत पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विराट कोहली याने सोशल मीडियावरून सुरक्षा दलांना अभिवादन करत संदेश दिला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 19:57 IST2025-05-09T19:56:35+5:302025-05-09T19:57:50+5:30

whatsapp join usJoin us
India Pakistan Conflict: War-like situation, IPL postponed, Virat Kohli expresses his feelings by saying Jai Hind | युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना

युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतानेऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश वातावरण निर्माण झालेले आहे. त्यात काल पाकिस्ताननेभारताच्या हद्दीत ड्रोनच्या माध्यमातून मोठ्या प्राणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सध्या सुरू असलेल्या आयपीएलला काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. भारत पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विराट कोहली याने सोशल मीडियावरून सुरक्षा दलांना अभिवादन करत संदेश दिला आहे. 

विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करत एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तो म्हणाला की, कठीण काळात आपल्या देशाचं रक्षण करत असलेल्या सशस्त्र दलांसोबत आम्ही एकजुटीने उभे आहोत. आम्ही आमच्या नायकांच्या अतूट शौर्य आणि देशासाठी दिलेल्या बलिदानासाठी त्यांचे कायम ऋणी राहू. जय हिंद.

दरम्यान, पाकिस्तानने काल जम्मू, पाठाणकोट, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला होता. मात्र भारताच्या सुरक्षा दलांनी हा हल्ला परतवून लावला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएलचे सामने काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहेत. त्यानंतर विराट कोहलीने ही पोस्ट केली आहे. 

Web Title: India Pakistan Conflict: War-like situation, IPL postponed, Virat Kohli expresses his feelings by saying Jai Hind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.