Pratika Rawal Fined For Breaching ICC Code of Conduct : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टी-२० मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही टीम इंडियानं विजयी सलामी दिलीये. पण या सामन्यात प्रतिस्पर्धी यजमान संघातील खेळाडूंसोबत भिडण सलामीची बॅटर प्रतिका रावल हिला चांगलेच महागात पडलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारताची स्टार बॅटरला 'दिदिगिरी' नडली...
पहिल्या वनडे सामन्यात बॅटिंग वेळी ICC अचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारताच्या सलामी बॅटरला दोषी ठरवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून या बॅटरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एक डिमेरिट पॉइंटही तिच्या खात्यात जमा झाला आहे. इथं जाणून घेऊयात नेमकं काय आहे प्रकरण? अन् आयसीसीनं तिला किती दंड ठोठावलाय? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती.
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
मैदानात तिनं काय चूक केली अन् ICC नं तिला काय शिक्षा दिली
भारत-इंग्लंड महिला संघातील पहिला वनडे सामना साउथहॅम्प्टनच्या मैदानात खेळवण्यात आला. १६ जुलैला झालेल्या या सामन्यात प्रतिका रावलकडून दोन चुका झाल्या. १८ व्या षटकात एकेरी धाव घेताना ती इंग्लंडची गोलंदाज लॉरेन फाइलरला धडकली होती. एवढेच नाही तर विकेट गमावल्यावर ड्रेसिंग रुममध्ये जाताना तिने सोफीला खांद्यानं धक्का मारल्याचा प्रकारही घडला होता. या प्रकरणात तिला सामन्याच्या मानधनातील १० टक्के रक्कम कपात करण्यात आली असून १ डेमिरिट पॉइंटही तिच्या खात्यात जमा झाला आहे. याशिवाय इंग्लडच्या संघावर स्लो ओव्हर रेटसंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. प्रतिका रावलसह इंग्लंडच्या संघाची कर्णधार नॅट सिल्वर-ब्रंट हिने सामनाधिकारी (मॅच रेफ्री) सारा बार्टलेट यांच्यासमोर आपली चूक मान्य केली आहे.
प्रतिका रावलनं सोडलीये खास छाप
शेफाली वर्माला संघाबाहेरचा रस्ता दाखवल्यावर प्रतिका रावल हिची टीम इंडियात एन्ट्री झाली. मागील १२ सामन्यात तिने आपल्या कामगिरीतील धमक दाखवत स्मृती मानधनासोबत आपली ओपनिंग जागा पक्की केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्मृती सोबत ४८ धावांची भागीदारी करताना तिने संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. एवढेच नाही तर स्मृतीसोबत सलामी बॅटरच्या रुपात सर्वोच्च सरासरीसह १००० धावांची भागीदारी करत वर्ल्ड रेकॉर्डही रचला होता.