Join us

रोहित-द्रविडच्या मनात वन डे वर्ल्ड कपचा भारतीय संघ तयार? ५ स्टार हॉटेलमध्ये बैठक

यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 18:54 IST

Open in App

Team India, ODI WC 2023:  एकदिवसीय विश्वचषकाचे (ODI World Cup 2023) यजमानपद यंदा भारताकडे आहे. या आयसीसी स्पर्धेसाठी अनेक खेळाडू रांगेत आहेत. पण यासाठीची रणनीती आणि योजना आधीच तयार केल्या जात आहेत. सध्या टीम इंडियाचे लक्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) च्या फायनलवर आहे. असे असूनही टीम इंडिया आपल्या वन डे वर्ल्ड कपसाठीच्या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी गुपचूप २० निवडक खेळाडूंची लिस्टही फायनल केली असल्याचे बोलले जात आहे.

WTC फायनल 7 जूनपासून आहे

भारतीय संघाला लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर ७ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC फायनल) अंतिम सामना खेळायचा आहे. त्याचा सामना ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. टीम इंडियाचे नेतृत्व सलामीवीर रोहित शर्माकडे असेल तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे असेल. जो संघ जिंकेल तो प्रथमच कसोटी चॅम्पियन बनेल. गतवर्षी भारताला संधी होती पण फायनलमध्ये न्यूझीलंडने त्याचा पराभव केला होता. 

WTC फायनलची चर्चा पण विश्वचषकाच्या ट्रॉफीवर BCCI ची नजर

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडच्या हातून टीम इंडियाचा 10 गडी राखून झालेल्या दारुण पराभवामुळे सावध असलेल्या बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष यावर्षी भारतात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेकडे लागले आहे. वर्षाच्या सुरुवातीला या संदर्भात अनेक मोठ्या बैठकाही झाल्या. वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2023 रोजी, बोर्ड सचिव जय शाह यांनी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, तत्कालीन मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांना आढावा बैठकीसाठी बोलावले होते. ही बैठक एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रोहित-द्रविडच्या मनात वन डे वर्ल्ड कपचा संघ तयार असल्याची चर्चा आहे. 

20 निवडक खेळाडू

विश्वचषकासाठी बीसीसीआयने आधीच २० खेळाडूंची निवड केली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्या बैठकीचा भाग असलेल्या एका विश्वसनीय सूत्राने ही माहिती दिली. आढावा बैठकीत 2023 च्या विश्वचषकापर्यंत या 20 खेळाडूंना संघात रोटेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :रोहित शर्माराहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ
Open in App