Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय क्रिकेट संघ 'वर्ल्ड सीरिज कप' स्पर्धेच्या अंतिम फेरीत

भारतीय संघाने World Series Cup दिव्यांग्य क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 17:28 IST

Open in App

लंडन : भारतीय संघाने World Series Cup दिव्यांग्य क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार यजमान इंग्लंडवर 25 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. भारताने 15 षटकांत 7 बाद 130 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंडला 14 षटकांत 8 बाद 98 धावाच करता आल्या. पाच देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने तीन सामने जिंकून जेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना रवींद्र संते आणि वसीम खान यांच्या दमदार सलामीच्या जोरावर भारताने 15 षटकांत 130 धावा केल्या. रवींद्रने 38 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 53 धावा केल्या, तर वसीमने 15 चेंडूंत 3 षटकार खेचून 22 धावा केल्या. इंग्लंडच्या लाएम ओ'ब्रायनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या अँगुस ब्राउन ( 24) वगळता अन्य फलंदाजांना अपयश आले. भारताच्या विक्रांत केणी व कुणाल फणसे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

पाहा हायलाईट्स...

टॅग्स :टी-20 क्रिकेटभारतइंग्लंड