Join us
Daily Top 2Weekly Top 5

Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?

यंदाच वर्ष हे टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पुन्हा पाहण्यासाठी चाहते वनडे मालिकेसाठीही उत्सुक असतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:37 IST

Open in App

Team India ODI Schedule 2026 : भारताचा महान फलंदाज विराट कोहली आणि माजी कर्णधार रोहित शर्मा ही जोडी फक्त वनडेत सक्रीय आहे. २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत या जोडीला पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हे ध्येय साध्य करण्यासाठी २०२६ हे वर्ष दोघांसाठीही महत्त्वपूर्ण असणार आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

यंदाच वर्ष हे टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पुन्हा पाहण्यासाठी चाहते वनडे मालिकेसाठीही उत्सुक असतील. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसह नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. या मालिकेसह भारतीय संघ यंदाच्या वर्षात एकूण १८ वनडे सामने खेळणार आहे. या कालावाधीत टीम इंडिया कधी अन् कुणाविरुद्ध किती सामने खेळणार?   त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 शानदार फॉर्ममध्ये ‘रो-को’

विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा जलवा पाहायला मिळाला.  विराट कोहलीने मागील ६ डावांत ३ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. रोहितच्या भात्यातूनही धमाकेदार खेळी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे ही जोडी नव्या वर्षाची सुरुवातही धमाक्यात करेल, अशी अपेक्षा आहे.

 न्यूझीलंडचा भारत दौरा (जानेवारी २०२६)

  • ११ जानेवारी- पहिला वनडे (बडोदा)
  • १४ जानेवारी- दुसरा वनडे (राजकोट)
  • १८ जानेवारी- तिसरा वनडे (इंदूर)

नव्या वर्षातील वनडे मालिकेनंतर थेट जूनमध्येच भारतीय संघ पुन्हा वनडे सामना खेळताना दिसेल. अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ घरच्या मैदानात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळताना दिसणार आहे. या मालिकेतील तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. 

भारताचा इंग्लंड दौरा (जुलै २०२६)

  • १४ जुलै- पहिला वनडे (बर्मिंगहॅम)
  • १६ जुलै- दुसरा वनडे (कार्डिफ)
  • १९ जुलै – तिसरा वनडे (लंडन) 

सप्टेंबरमध्ये  वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये  भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर तीन सामन्यांची मालिका खेळताना दिसेल. या वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांची वनडे मालिका देखील खेळणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Team India's 2026 ODI Schedule: Kohli-Rohit's Craze and Match Count

Web Summary : Virat Kohli and Rohit Sharma will be vital in 2026 for the 2027 World Cup. India starts with New Zealand, playing 18 ODIs. Key series include England, West Indies, New Zealand, and Sri Lanka, promising exciting cricket.
टॅग्स :नववर्ष 2026भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहलीन्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघ