Join us

भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले!

भारतीय महिलांनी प्रथमच कोरले विश्वचषकावर नाव; शफाली वर्मा प्लेयर ऑफ द मॅच, तर दीप्ती शर्मा ठरली प्लेयर ऑफ द सीरीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 07:29 IST

Open in App

रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महिला क्रिकेट विश्वात रविवारी भारतीय महिलांनी नवा इतिहास घडवला असून, विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत एकदिवसीय विश्वचषकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले. महिलांनी धडाकेबाज खेळ करत विजय मिळवून संपूर्ण भारतीयांचे हरमन जिंकले. त्यानंतर संपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली. आसमंत आनंदोत्सवाच्या आतषबाजीने उजळून निघाला होता.

भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी पहिल्यांदाच आयसीसी विश्वचषक उंचावत कोटचवची भारतीयांना जल्लोषाची संधी दिली. दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी धूळ चारत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऐतिहासिक विश्वविजेतेपद पटकावले. यासह भारत पुरुष व महिला क्रिकेट विश्वचषक पटकावणारा ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यानंतरचा तिसरा संघ ठरला.

भारताने दिलेल्या २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वॉल्वाईटने ४१व्या षटकापर्यंत भारतीयांना झुंजकले. अखेर ४रख्या पटकातील पहिल्या चेंडूवर अमनजोतने तिचा अप्रतिम झेल घेत भारताच्या विश्वविजयातील मार्ग मोकळा केला. शफालीने ८७ चावा तडकाढून भारताला धडाकेबाज सुरुवात करून दिली. तर दीप्तीने पाच बळी घेत द. आफ्रिकेला खिंडार पाडले.

२०११ साली मुंबईत भारतीय पुरुष संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर १४ वर्षांनी नवी मुंबईत महिलांनी नदी झेप घेत एकदिवसीय विश्वचषक पटकावला.

पंतप्रधान म्हणाले, अतुलनीय विजय

भारतीय संघाने मिळवलेला हा अतुलनीय विजय आहे. संघाने दाखवलेले टीमवर्क आणि चिकाटी अप्रतिम होती. सर्व खेळाडूचे अभिनंदनः हा ऐतिहासिक विजय भावी पिढ्यांतील खेळाडूंना प्रेरणा देईल. अधिक युवक-युवतींना क्रीडाक्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करेल.-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

English
हिंदी सारांश
Web Title : India Creates History: Women Win World Cup, Hearts of Indians!

Web Summary : Indian women's cricket team won the World Cup, defeating South Africa by 52 runs. This historic win marks their first World Cup victory, celebrated nationwide. Shafali's explosive start and Deepti's five wickets led India to success.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघ