India Captain Suryakumar Yadav WinToss Elect To bowl Against Pakistan : दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ या सामन्यात दोन बदलासह मैदानात उतरला आहे. ओमान विरुद्धच्या लढतीनंतर अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना पुन्हा बाकावर बसवण्यात आले असून जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांचे संघात कमबॅक झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ओमान विरुद्धच्या साममन्यात अक्षर पटेल याला दुखापत झाली होती. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो खेळणार की, नाही यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण तो फिट असून महत्त्वपूर्ण लढतीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम आहे. त्यामुळे टॉस वेळीच टीम इंडियाची त्याच्याशिवाय मैदानात उतरण्याची चिंता मिटल्याचेही स्पष्ट झाले. अक्षर पटेल हा गोलंदाजीसह फलंदाजीत संघातील उपयुक्त खेळाडू आहे.
कोण आहे ती? IND vs PAK मॅच आधी गिल अन् अभिषेकला व्हिडिओ कॉल केला अन्...
सुपर फोरमधील पहिल्या लढतीसाठी अशी आहे भारतीय प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन
सईम अयूब,साहिबझादा फरहान,फखर झमान, सलमान अली आगा (कॅप्टन), हुसेन तलात, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, फहीम अशरफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद.