Rishabh Pant To Wear Virat Kohli's Iconic No. 18 Jersey On Comeback : भारतीय संघाचा स्टार विकेट किपर बॅटर रिषभ पंत तीन महिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या चार दिवसीय कसोटी मालिकेत तो भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व करत आहे. बंगळुरुच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात रिषभ पंतविराट कोहलीची ऑयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात मिरवताना दिसले. ही गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतआधी भारत 'अ' संघाकडून हा खेळाडूही १८ क्रमांकाची जर्सी घालून उतरलेला मैदानात
रिषभ पंत हा टीम इंडियाकडून खेळताना १७ क्रमांकाची जर्सी वापरतो. पण भारत 'अ' संघाचे नेतृत्व करताना पंत १८ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरला. त्यामुळे त्याने जर्सी बदलली का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विराटशिवाय भारतीय संघातील खेळाडूनं १८ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरण्याची तशी ही पहिली वेळ नाही. याआधी मुकेश कुमार भारतीय 'अ' संघाकडून इंग्लंड लायन्सविरुद्ध १८ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोलही केल्याचे पाहायला मिळाले होते.
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
विराटची जर्सी ना कुणाला वापरता येईल, ना ती निवृत्त करण्याचा निर्णय घेतला जाईल! कारण...
मुकेश कुमार १८ क्रमांकाची जर्सी घालून स्पॉट झाल्यावर विराट कोहलीची १८ क्रमांकाची ऑयकॉनिक जर्सी देखील सचिन तेंडुलकर (१०) आणि महेंद्रसिंह धोनी (०७) यांच्याप्रमाणे निवृत्त करावी, अशी मागणी करण्यात आली होती. विराट कोहली हा कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी वनडे क्रिकेटसह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कनेक्ट आहे. त्यामुळे त्याची जर्सी कुणालाही वापरता येणार नाही किंवा ती निवृत्तही करता येणार नाही.
मग मुकेश कुमार याच्यानंतर पंत १८ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात कसा उतरला?
मुकेश कुमारनं १८ क्रमांकाची जर्सी घातल्यावर निर्माण झालेल्या वादानंतर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, अनौपचारिक कसोटी सामन्यात अर्थात भारत 'अ' संघाकडून खेळताना खेळाडू नावाच्या जर्सीसह मैदानात उतरत नाहीत. एवढेच नाही तर खेळाडूंना कोणत्याही क्रमांकाची जर्सी वापरता येते. आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडूंना नावासह विशिष्ट क्रमाक दिले जातात, असे स्पष्ट केले होते.