Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल

सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी ३ चेंडूत गमावल्य ३ विकेट्स अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:11 IST

Open in App

Asia Cup Rising Stars 2025 Bangladesh A Shock India A In Super Over To Enter Final : रायझिंग स्टार टी-२० आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. त्यातही बांगलादेशच्या संघाने एकही चेंडूचा सामना न करता फायनल गाठत भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे.

सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघातील फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यामुळे बांगलादेशच्या संघाने सहज फायनल गाठल्याचे पाहायला मिळाले. सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर नियमानुसार, भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. वैभव सूर्यवंशीला पाठवून जोखीम पतकरण्याऐवजी कर्णधार जितेश शर्मा फलंदाजीला आला. पण हा प्रयोग फसवा ठरला. रिपन मंडोल याने पहिल्याच चेंडूवर अप्रतिम यॉर्करवर त्याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर रिपन मंडोल (Ripon Mondol) याने त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या आशुतोष शर्माला झेलबाद केले. सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने दोन चेंडूत २ विकेट गमावल्यामुळे बांगलादेशच्या संघाला फक्त एका धावेच टार्गेट मिळाले होते.

बांगलादेशचा संघासाठी एक धाव काही फार मोठा टास्क नव्हते. पण भारताकडून सुपर ओ्हर घेऊन आलेल्या  सूयश शर्मानं पहिल्याच चेंडूवर बांगलादेशला धक्का देत सामन्यात आणखी ट्विस्ट आणले.  सामन्यात पुन्हा एक संधी मिळवून फायनल गाठण्याची आस कायम राखण्यासाठी भारतीय संघाला दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या विकेटची आवश्यकता होती. पण सूयशचा दुसरा चेंडू टप्पा पडल्यावर लेग स्टंपच्या बाहेर गेला. नियमाप्रमाणे मैदानातील पंचांनी हा चेंडू वाइड घोषित केला. त्यामुळे या अवांतर धावेसह एकाही चेंडूचा सामना न करता मॅच जिंकत बांगलादेशच्या संघाने दुसऱ्यांदा या स्पर्धेची फायनल गाठली.

English
हिंदी सारांश
Web Title : India A's Super Over Flop: Bangladesh Reaches Final Without a Ball!

Web Summary : Bangladesh A reached the final of the Rising Star Asia Cup in a dramatic super over, defeating India A. India A collapsed in their super over without scoring a run. Bangladesh won without facing a single ball.
टॅग्स :एशिया कपभारत विरुद्ध बांगलादेशवैभव सूर्यवंशी