India A vs South Africa A 1st Test Match : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील कसोटी मालिकेआधी भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' संघात दोन सामन्यांचा अनौपचारिक कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. बंगळुरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला २३४ धावांत रोखत पहिल्या डावात  ७५ धावांची अल्प आघाडी घेतली आहे. 
 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
कमबॅकमध्ये पंतचा फ्लॉप शो! टीम इंडिया बॅकफूटवर
भारतीय संघाकडून पहिल्या डावात मुंबईकर युवा बॅटर आयुष म्हात्रे याने  ७६ चेंडूत केलेली ६५ धावांची खेळी सर्वोच्च ठरली. त्याच्याशिवाय रिषभ पंतसह स्टार बॅटरच्या फ्लॉपशोमुळे टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. इंग्लंड दौऱ्यात दुखापतीमुळे संघाबाहेर पडलेल्या रिषभ पंतनं दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या कसोटी सामन्यातून कमबॅक केले. पण त्याला फलंदाजीत धमक दाखवता आली नाही. 
IND A vs SA A: पंतच्या कॅप्टन्सीत चमकला MS धोनीचा पठ्ठ्या! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धमाकेदार पदार्पण
पंतसह स्टार खेळाडूंचा फ्लॉप शो!
विराट कोहलीची १८ क्रमांकाची आयकॉनिक जर्सी घालून मैदानात उतरल्यामुळे चर्चेत आलेला पंत अवघ्या १७ धावांवर बाद झाला. याशिवाय रजत पाटीदार आणि देवदत्त पडीक्कलसह साई सुदर्शनही फलंदाजीत अपयशी ठरले. परिणामी भारताचा पहिला डाव २३४ धावांवर आटोपला.  दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ३०९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या डावात बिन बाद ३० धावा करत १०५ धावांची आघाडी घेतली आहे.
आयुष म्हात्रेच अर्धशतकाशिवाय साईला चांगली सुरुवात मिळाली, पण...
आयुष म्हात्रेच्या अर्धशतकाशिवाय भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना साई सुदर्शन याने ९४ चेंडूचा सामना करताना ३ चौकाराच्या मदतीने ३२ धावा केल्या. पण चांगली सुरुवात मिळाल्यावर त्याने विकेट फेकली. याशिवाय आयुष बडोनी याने ४७ चेंडूत ३८ धावांची खेळी वगळता अन्य कोणत्याही बॅटरला छाप सोडता आली नाही. देवदत्त पडीकल २२ चेंडूत ६ धावा करून माघारी फिरला. रजत पाटीदारनं दुहेरी आकडा गाठला. पण तो १९ धावांवर बाद झाला.  या स्टार खेळाडूंच्या फ्लॉप शोमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात टीम इंडिया अडचणीत आणले आहे. पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय अ संघासमोरील दक्षिण आफ्रिका 'अ' संघाची कामगिरी शुबमन गिल आणि गौतम गंभीर जोडीसमोर घरच्या मैदानातील कसोटी मालिका आव्हानात्मक असेल,  याचे संकेत देणारी आहे.