Who Is G Kamalini Is All Set To Make Her T20I Debut Place Of Smriti Mandhana Against Sri Lanka : भारत आणि श्रीलंका महिला संघातील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना तिरुवनंतपुरमच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघ दोन बदलासह मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. चौथ्या सामन्यात कमालीच्या फॉर्ममध्ये दिसलेली भारताची उप कर्णधार आणि स्फोटक बॅटर स्मृती मानधनाला विश्रांती देत तिच्या जागी १७ वर्षीय जी. कमलिनी (G Kamalini) हिला टी-२० पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१७ वर्षीय युवा खेळाडूला कर्णधार हरमनप्रीत कौरनं दिली डेब्यू कॅप
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने तिला डेब्यू कॅप दिली. याशिवाय रेणुका सिंह ठाकूरच्या जागी कमबॅक क्वीन स्नेह राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना कमलिनी शेफालीच्या साथीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना पाहायला मिळेल.
कोण आहे जी. कमलिनी?
जी कमलिनी ही अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुऱ्या हाताने सलामीवीराच्या रुपात तिने महिला अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धा गाजवली होती. तमिळनाडूची ही खेळाडू यष्टीमागील जबाबदारीसह फिरकी गोलंदाजाच्या रुपातही उपयुक्त ठरू शकते. भारतीय महिला संघाला अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देण्यात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या स्पर्धेत तिने ८ सामन्यात ३११ धावा केल्या होत्या. भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती टॉपर राहिली. याचा फायदा तिला WPL च्या मेगा लिलावात झाला. मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघाने १.६० कोटी रुपयांसह तिला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. श्रीलंकेविरुद्धच्या द्विपक्षिय मालिकेत पहिल्या चार सामन्यात बाकावर बसवल्यावर अखेरच्या सामन्यात तिला पदार्पणाची संधी मिळाली. याआधी अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत तिच्यासोबत गोलंदाजीत खास छाप सोडणाऱ्या वैष्णवी शर्मा हिने या मालिकेतून भारतीय संघाकडून पदार्पण केले होते.
Web Summary : Seventeen-year-old G Kamalini debuted in T20I for India, replacing Smriti Mandhana in the match against Sri Lanka. Captain Harmanpreet Kaur presented her with the debut cap. Sri Lanka won the toss and chose to bowl. Kamalini opened the innings with Shafali.
Web Summary : सत्रह वर्षीय जी कामलिनी ने श्रीलंका के खिलाफ मैच में स्मृति मंधाना की जगह भारत के लिए टी20आई में पदार्पण किया। कप्तान हरमनप्रीत कौर ने उन्हें डेब्यू कैप दी। श्रीलंका ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया। कामलिनी ने शेफाली के साथ पारी की शुरुआत की।