Join us

IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'

 महिला विश्वचषक स्पर्धेतील एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय बॅटर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 19:08 IST

Open in App

Smriti Mandhana Breaks Mithali Raj Record : भारतीय महिला संघाची उप-कर्णधार आणि सलामीची बॅटर स्मृती मानधना हिनं आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात इतिहास रचला आहे.  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवी मुंबईतील अंतिम सामन्यात २१ धावा पूर्ण करताच तिने माजी कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडीत काढला.महिला विश्वचषक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता स्मृती मानधनाच्या नावे झाला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वनडे क्वीन स्मृतीनं मोडला मिताली राजचा विक्रम

याआधी हा विक्रम मिताली राज हिच्या नावे होता. २०१७ च्या हंगामात भारतीय संघाला फायनलपर्यंत घेऊन जाणाऱ्या मितालीनं ४०९ धावा करत हंगाम गाजवला होता. २०२५ च्या हंगामात वनडे क्वीन स्मृतीनं मितालीचा विक्रम मागे टाकला आहे. यंदाच्या हंगामात २ अर्धशतके आणि एका शतकाच्या मदतीने स्मृती मानधना हिने ९ सामन्यातील ९ डावात ४३४ धावा केल्या आहेत. 

शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा

 महिला विश्वचषक स्पर्धेतील एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय बॅटर 

  •  स्मृती मानधना-४३४ (२०२५)
  •  मिताली राज -४०९ (२०१७)
  •  पूनम राऊत - ३८१ (२०१७)
  • हरमनप्रीत कौर-३५९ (२०१७)
  •  स्मृती मानधना- ३२७ (२०२२)

महिला विश्वचषकातील एका हंगामात सर्वाधिक धावा करणारी 'क्वीन' कोण?

जगातील विक्रमाबद्दल बोलायचं झालं तर, एका वर्ल्ड कपच्या आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीली हिच्या नावावर आहे. तिनं २०२२ च्या हंगामात ५०९ धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामातील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हिला हा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. यासाठी तिला फायनलमध्ये ४० धावा कराव्या लागतील.

फायनलमध्ये  शफालीसोबत शतकी भागीदारी रचली,  पण स्मृतीचं अर्धशतक हुकलं

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायलमध्ये स्मृती मानधना हिने ५८ चेंडूत ८ चौकाराच्या मदतीने ४५ धावांची खेळी केली. तिचे अर्धशतक ५ धावांनी हुकले. पण त्याआधी तिने शफाली वर्माच्या साथीनं शतकी भागीदारी करत संघाला उत्तम सुरुवात करुन दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी १०६ चेंडूत १०४ धावांची भागीदारी रचली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Smriti Mandhana surpasses Mithali Raj, becomes 'Number One' in ODIs.

Web Summary : Smriti Mandhana broke Mithali Raj's record for most runs in a Women's World Cup season during the final against South Africa. She scored 434 runs, surpassing Raj's 409 in 2017. Mandhana missed her half-century in the final but formed a century partnership with Shafali Verma.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकास्मृती मानधनामिताली राज