Smriti Mandhana ची फिफ्टी हुकली; पण स्फोटक खेळीसह साधला ४००० प्लसचा मोठा डाव

आयर्लंड विरुद्धच्या वनडेत स्मृती मानधनाची कमाल, ९५ व्या सामन्यात साधला मोठा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:38 IST2025-01-10T16:34:38+5:302025-01-10T16:38:08+5:30

whatsapp join usJoin us
IND W vs IRE W 1st ODI Smriti Mandhana Becomes Second Indian Batter To Reach 4000 Runs In W ODIs | Smriti Mandhana ची फिफ्टी हुकली; पण स्फोटक खेळीसह साधला ४००० प्लसचा मोठा डाव

Smriti Mandhana ची फिफ्टी हुकली; पण स्फोटक खेळीसह साधला ४००० प्लसचा मोठा डाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Smriti Mandhana Becomes Second Indian Batter To Reach 4000 Runs : राजकोटच्या मैदानात रंगलेल्या आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाची स्टार बॅटर आणि कार्यवाहू कॅप्टन स्मृती मानधना हिने खास पल्ला गाठला आहे. स्मृती मानधानने वनडे क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पा पार केला असून अशी कामगिरी करणारी ती भारतीय महिला क्रिकेटमधील दुसरी बॅटरठरली आहे. महिला क्रिकेट जगतात याबाबतीत तिचा १५ वा नंबर लागतो. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२९ चेंडूत ४१ धावांची धमाकेदार खेळी

नियमित कॅप्टन हरमनप्रीत कौरनं विश्रांती घेतल्यामुळे आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत स्मृती मानधना संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. आयर्लंड महिला संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधनाने भारतीय डावातील नवव्या षटकात एक धाव घेत मैलाचा पल्ला गाठला. या सामन्यात तिचे अर्धशतक अवघ्या ९ धावांनी हुकले. तिने पहिल्या वनडेत २९ चेंडूत ४१ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीत तिने ६ चौकारांसह एक उत्तुंग षटकारही मारल्याचे पाहायला मिळाले. 

मिताली राजनंतर वनडेत असा पराक्रम करणारी दुसरी भारतीय बॅटर ठरली स्मृती


स्मृती मानधना हिने ९५ व्या वनडे सामन्यात ४ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तिच्याआधी फक्त मिताली राजनं हा टप्पा गाठला होता. भारताची माजी कर्णधार मिताली राजच्या खात्यात वनडेत ७८०५ धावांची नोंद आहे. 

अबतक ४००० धावा, २९ अर्धशतकांसह ९ शतकांसह गाठला मैलाचा पल्ला

मानधनाने भारताकडून महिला एकदिवसीय सामन्यात धावा काढणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, मिताली राजच्या मागे ७८०५ धावा आहेत. राज आणि मानधनाने महिला एकदिवसीय सामन्यात ४००० धावा करणाऱ्या एकमेव दोन खेळाडू आहेत. वनडेत स्मृती मानधाने आतापर्यंत २९ अर्धशतकासह ९ शतके झळकावली आहेत. 
 

Web Title: IND W vs IRE W 1st ODI Smriti Mandhana Becomes Second Indian Batter To Reach 4000 Runs In W ODIs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.