Australia Women vs India Women, 1st ODI : स्मृतीचा मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनच्या अर्धशतकी खेळीनंतर काशवी गौतमच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर ब्रिस्बेन येथील वनडे सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर २१५ धावांचे टार्गेट सेट केले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दुखापतीतून सावरून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात सामील झालेल्या प्रतिका रावलच्या साथीनं स्मृतीनं भारताच्या डावाला सुरुवात केली. पण पहिल्याच षटकात प्रतिका खातेही न उघडता माघारी फिरली. शेफाली वर्मा ४ (१७) आणि जेमिमा रॉड्रिग्ज ८ (१३) स्वस्तात आटोपल्यावर स्मृतीनं अर्धशतकी खेळीसह संघाचा डाव सावरला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
स्मृती हरमनप्रीत कौर यांनी अर्धशतकासह सावरला डाव
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना स्मृती मानधना हिने हरमनप्रीत कौरच्या सातीनं चौथ्या विकेटसाठी ७२ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. ही खेळी संघाचा डाव सावरणारी अशीच होती. स्मृती मानधना ८४ चेंडूत ५८ धावा करून परतल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने अर्धशतक झळकावले. या दोघींच्या अर्धशतकाशिवाय काशवी गौतम हिने आपल्या खेळीसह सर्वांचे लक्षवेधून घेतले.
AUS W vs IND W : टीम इंडियाच्या 'क्वीन'ची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधला 'फिफ्टी प्लस'चा विक्रमी डाव
काशवी गौतमचे अर्धशतक हुकले, पण...
हरमनप्रीत कौरनं काशवि गौतमच्या साथीनं सातव्या विकेटसाठी ६१ चेंडूत ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. हरमनप्रीत कौर ८४ चेंडूत ५४ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे काशवीनं ४४ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४३ धावांची उपयुक्त खेळी करत संघाच्या धावफलकावर २१४ धावा लावल्या. काशवी गौतम हिने गतवर्षी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून वनडेत पदार्पण केले आहे. मध्यम जलदगती गोलंदाज असलेल्या काशवीनं फलंदाजीतील धमक दाखवल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढाई २०० पारची करणंं टीम इंडियाला शक्य झालं. त्यामुळेच तिची ही खेळी खास ठरते. फक्त ४ वनडेचा अनुभव असलेल्या या २२ वर्षीय युवा खेळाडूची खेळी ही भारतीय महिला संघातील फलंदाजीतील मजबूती दाखवणारीच आहे. ऑस्ट्रेलियाकडून ॲशली गार्डनर हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मेगन शुट हिने २ तर अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा आणि सोफी मोलीन्युक्स यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
Web Summary : Smriti Mandhana and Harmanpreet Kaur's half-centuries, followed by Kashvee Gautam's crucial knock of 43, helped India set a target of 215 against Australia in the first ODI. India recovered from early wickets, showcasing batting depth.
Web Summary : स्मृति मंधाना और हरमनप्रीत कौर के अर्धशतकों और काशवी गौतम के महत्वपूर्ण 43 रनों की बदौलत भारत ने पहले वनडे में ऑस्ट्रेलिया के खिलाफ 215 रनों का लक्ष्य रखा। शुरुआती विकेट गिरने के बाद भारत ने बल्लेबाजी में गहराई दिखाई।