Join us

Ind Vs WI T20 : पदार्पणाच्या वेळी थोडा नर्व्हस होतो, पण द्रविड आणि... : आवेश खान

Ind Vs WI T20 : आवेशने रविवारी चार षटकांत ४२ धावा मोजल्या.  भारताने हा सामना मात्र १७ धावांनी जिंकला.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 06:40 IST

Open in App

कोलकाता : वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात पदार्पणाची संधी मिळत असल्याचे कळताच सुरुवातीला थोडा नर्व्हस होतो, पण कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी माझा आत्मविश्वास उंचावण्यास मदत केली,’ असे वेगवान गोलंदाज आवेश खान याने म्हटले आहे.

आवेशने रविवारी चार षटकांत ४२ धावा मोजल्या.  भारताने हा सामना मात्र १७ धावांनी जिंकला.  बीसीसीआयने प्रसारित कलेल्या व्हिडीओत सहकारी व्यंकटेश अय्यरशी गप्पा मारताना आवेश म्हणाला, ‘घाबरणे स्वाभाविक आहे, पदार्पणाची संधी मिळणार हे कळताच थोडा नर्व्हस होतो. कठोर मेहनतीचे फळ मिळणार होते.  रोहित आणि द्रविड यांनी माझा उत्साह वाढविला.  पदार्पणाचा संपूर्ण आनंद घे, असा सल्ला दिला.  हा क्षण पुन्हा येणार नाही हे ध्यानात घेत मीदेखील सामन्याचा संपूर्ण आनंद लुटला.’  ‘लक्ष्य गाठण्यासाठी मी दीर्घकाळ खेळू इच्छितो. देशासाठी खेळणे हे  प्रत्येक खेळाडूचे  स्वप्न असते. 

टॅग्स :आवेश खानभारतीय क्रिकेट संघ
Open in App