Join us

IND vs WI Series : १, २, ३, ४, ५... भारतीय संघातील कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढतच चालली; आणखी एक खेळाडू विलगीकरणात

India vs West Indies Series : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेमागे लागलेलं कोरोनाचं संकट संपता संपेना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 13:31 IST

Open in App

India vs West Indies Series : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेमागे लागलेलं कोरोनाचं संकट संपता संपेना... बुधवारी शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील ३ सदस्यांचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि सर्वांना विलगीकरणात जावे लागले. भारतीय संघाचे आजचे सराव सत्रही रद्द करावे लागल्यानं रविवारी होणाऱ्या पहिल्या वन डेवर अनिश्चिततेचं सावट आहे. आता त्यात टीम इंडियाची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल ( Axar Patel) याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तो भारताच्या कॅम्पमध्ये दाखल झालेला नाही. भारताच्या संघातील कोरोना पॉझिटिव्ह आलेला हा पाचवा खेळाडू आहे. 

अक्षर पटेलचा केवळ ट्वेंटी-२० संघात समावेश केला गेला आहे. पण, तो अहमदाबाद येथे बायो बबलमध्ये दाखल होणार होता. परंतु त्यालाही विलगिकरणात जावे लागणार आहे. त्याला दुखापतीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकावे लागले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तो संघाचा भाग नव्हता. रवींद्र जडेजाच्या गैरहजेरीत अक्षर पटेलनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसऱ्यांदा अक्षर पटेलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

  • सलामीवीर शिखर धवन आणि जलदगती गोलंदाज नवदीप सैनी ( राखीव खेळाडू) यांची सोमवारी RT-PCR टेस्ट करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 
  • क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलिप आणि  Security Liaison Officer बी लोकेश यांचीही सोमवारी RT-PCR टेस्ट घेण्यात आली आणि त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.  
  • ऋतुराज गायकवाड याची मंगळवारी टेस्ट झाली आणि तो पॉझिटिव्ह आला. पण, सोमवारी पहिल्या राऊंडमध्ये त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.  
  • श्रेयस अय्यर आणि स्पोर्स्ट मसाज थेरपिस्ट राजीव कुमार यांची बुधवारी झालेल्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या दोघांचाही पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.   
टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशिखर धवनअक्षर पटेलश्रेयस अय्यर
Open in App