Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजू सॅमसनचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं! पण पठ्ठ्यानं किंग कोहलीचा विक्रम मोडून जगाचं लक्ष वेधलं

कोहलीचा १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडत संजूनं प्रस्थापित केला नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 00:39 IST

Open in App

IND vs WI Sanju Samson Breaks Virat Kohli's Record : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याने आपल्या फलंदाजीतील सर्वोच खेळी साकारली. सेमीफायलसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात संजू एकटा कॅरेबियन संघावर भारी पडला. त्याने ५० चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी करत संघाला सेमी फायनलचं तिकीट मिळवून देणारी अविस्मरणीय खेळी साकारली. त्याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं. पण यातही त्याने किंग कोहलीचा विराट विक्रम मोडून अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. 

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विक्रमी खेळी 

धावांसाठी संघर्ष करत असल्यामुळे टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात बाकावर बसवण्यात आलेल्या संजूला सुपर ८ मधील महत्त्वपूर्ण लढतीत पुन्हा एकदा सलामीवीराच्या रुपात पसंती देण्यात आली. त्याने या संधीचं सोन करण्यासाठी ईडन गार्डन्सचं मैदान निवडलं. ज्या मैदानात भारतीय संघातील इतर फलंदाजांनाच नव्हे तर कॅरेबियन संघातील कुणालाच अर्धशतक झळकावता आले नाही तिथं या पठ्ठ्यानं ९७ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याची ही खेळी शतकापेक्षा कमी नाही. कारण या खेळीनं टीम इंडियाचं स्वप्न जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे. एवढेच नाही तर वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिली आणि कारकिर्दीत धावांचा पाठलाग करणारी मोठी खेळी करताना त्याने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला. 

IND vs WI : एकच वादा सूर्या दादा... हवेत झेपावत अविश्वसनीय झेल घेत लुटली मैफिल (VIDEO)

कोहलीचा १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडत संजूनं प्रस्थापित केला नवा विक्रम

याआधी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम विराट कोहलीच्या नावे होता. २०१६ मध्ये कोहलीनं मोहालीच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि २०२२ मध्ये मेलबर्नच्या मैदानात पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांची खेळी केली होती. हा विक्रम संजूनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात मोडीत काढला.  

धावांचा पाठलाग करताना टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाच सर्वोच्च खेळीचा रेकॉर्ड

खेळाडूधावाचेंडूचौकारषटकारस्ट्राइक रेटप्रतिस्पर्धीमैदानतारीख
संजू सॅमसन९७*५०१२१९४ वेस्ट इंडिजईडन गार्डन्स१ मार्च २०२६
विराट कोहली८२*५११६०.७८ऑस्ट्रेलियामोहाली२७ मार्च २०१६
विराट कोहली८२*५३१५४.७१पाकिस्तानमेलबर्न२३ ऑक्टोबर २०२२
रोहित शर्मा७९*४६१७१.७३ऑस्ट्रेलियाब्रिजटाउन७ मे २०१०
विराट कोहली७८*६११२७.८६पाकिस्तानकोलंबो (RPS)३० सप्टेंबर २०१२
English
हिंदी सारांश
Web Title : Sanju Samson misses century, breaks Kohli's record in T20 World Cup!

Web Summary : Sanju Samson's unbeaten 97 against West Indies propelled India towards the semi-finals. His brilliant innings broke Virat Kohli's record for the highest score in a T20 World Cup chase, captivating the world's attention. A memorable knock!
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध वेस्ट इंडिजसंजू सॅमसनविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ