दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतीय संघाने अल्प धावसंख्येचा पाठलाग करत दुसऱ्या सान्यातील विजयासह कसोटी मालिका २-० अशी आपल्या नावे केली. दुसऱ्या डावात १२१ धावांचे आव्हान मिळाल्यावर पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी ५८ धावांची आवश्यकता होती. साई सुदर्शन आणि शुबमन गिलच्या रुपात भारतीय संघाने दोन विकेट्स गमावल्या. पण दुसऱ्या बाजूला सलामीवीर लोकेश राहुलनं अर्धशतक साजरे करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिली ट्रॉफी जिंकली आहे.
दुसऱ्या डावात कॅरेबियन ताफ्यातून दोन शतकासह एक अर्धशतक, पण..
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ५१८ धावा करत डाव घोषित केला होता. कुलदीप यादवनं वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात अर्धा संघ तंबूत धाडला. परिणामी पाहुण्या संघाचा पहिला डाव २४८ धावांवर आटोपला. शुबमन गिलनं कॅरेबियन संघाला फॉलोऑन देत पुन्हा त्यांना फलंदाजीसाठी निमिंत्रित केले. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज संघाने कडवी झुंज देत सामना पाचव्या दिवसांपर्यंत नेला. सलामीवीर कॅम्बबेलच विक्रमी शतकाशिवाय शई होपच्या भात्यातून शतक पाहायला मिळाले. जस्टिन ग्रीव्ह्स याने नाबाद अर्धशतकासह जेडन सील्सच्या साथीनं दहाव्या विकेटसाठी केलेल्या ७९ धावांची भागीदारीच्या जोरावर ३९० धावा करत भारतीय संघासमोर १२१ धावांचे टार्गेट सेट करत सामना पाचव्या दिवसांपर्यंत नेला. भारतीय संघाने ७ विकेट्स गमावत सामन्यासह मालिका २-० अशी नावे केली.
KL राहुलनं नाबाद अर्धशतकासह विजय केला निश्चित
वेस्ट इंडिजच्या संघाने दिलेल्या १२१ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालच्या रुपात भारतीय संघाने चौथ्या दिवसाच्या खेळातच यशश्वी जैस्वालच्या रुपात पहिली विकेट गमावली. पण पाचव्या आणि अखेरच्या दिवशी सलामीवीर लोकेश राहुल शेवटपर्यंतमैदानात थांबला आणि त्याने नाबाद अर्धशतकी खेळीसह संघाला विजय मिळवून दिला. यशस्वी दैस्वालनं ७ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने ८ धावा केल्या. साई सुदर्शन याला पाचव्या आणि अखेरच्या दिवशी अर्धशतकाची संधी होती. पण ३९ धावांवरतो चेसच्या गोलंदाजीवर फसला. शुबमन गिलही मोठा फटका मारण्याच्या नादात १३ धावा करून बाद झाला. ध्रुव जेरलच्या नाबाद ६ धावा आणि लोकेश राहुलची १०८ चेंडूत संयमी खेळीसह केलेल्या नाबाद ५८ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकारही मारले.