Shubman Gill Record : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताचा युवा कर्णधार शुबमन गिलनं शतक झळकावले. कसोटी कारकिर्दीतील दहाव्या शतकासह त्याने क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन' सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांच्यासह किंग कोहलीचा महारेकॉर्ड मोडला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाच्या प्रिन्सनं मोडला क्रिकेटमधील 'डॉन'चा महारेकॉर्ड
शुबमन गिलनं इंग्लंड दौऱ्यातून कसोटी कर्णधाराच्या रुपात आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली. टीम इंडियाच्या प्रिन्सनं नवी जबाबदारी खांद्यावर पडल्यावर १२ डावात ५ वे शतक झळकावत क्रिकेटमधील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांचा ८८ वर्षांपूर्वीचा महारेकॉर्ड मोडीत काढला. ब्रॅडमन यांनी आपल्या कारकिर्दीत कॅप्टन्सीत १३ डावात ५ शतके झळकावली होती.
कसोटीत कमी डावात सर्वाधिक शतक झळकावणारे कर्णधार
- ९ डावात : सर ॲलिस्टर कुक
- १० डावात: सुनील गावसकर
- १२ डावात: शुबमन गिल
- १३ डावात: डॉन ब्रॅडमन
- १४ डावात: स्टीव स्मिथ
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
शुबमन गिलचं कॅप्टन्सीतील एका कॅलेंडर ईयरमधील हे पाचवे शतक ठरले. यासह त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रममशिन कोहलीनं २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये एका वर्षात ५ कसोटी शतके झळकावल्याच्या रेकॉर्ड आहे. याबाबतीत गिलनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. सचिन तेंडुलकरनं १९९७ मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करताना त्यावर्षी ४ शतके ठोकली होती.
भारतीय संघाचे नेतृत्व करताना १२ डावात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा खेळाडू
- ८-महेंद्रसिंह धोनी
- ७- सुनील गावसकर
- ६- शुबमन गिल
- ५- विराट कोहली
- ५- विजय हजारे
भारतीय संघाचे नेतृत्व करताना १२ डावात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा खेळाडू
- ८- महेंद्रसिंह धोनी
- ७- सुनील गावसकर
- ६- शुबमन गिल
- ५- विराट कोहली
- ५- विजय हजारे
गिलनं १७७ चेंडूत शतक साजरे करताना १० व्या शतकासह WTC मध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रमही आपल्या नावे केलाआहे. त्याने रोहित शर्माला मागे टाकत या यादीत अव्वलस्थान पटकावले आहे.
WTC च्या इतिहासात सर्वाधिक शतक झळकावणारे भारतीय
- १० - शुबमन गिल*
- ९ -रोहित शर्मा
- ७ -यशस्वी जैस्वाल
- ६-रिषभ पंत
- ६-केएल राहुल