Sai Sudharsan Stunning No Look Catch Video : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात फलंदाजीत धमक दाखवल्यावर साई सुदर्शन याने दुसऱ्या दिवसाच्या खेळात मैदानातील आपल्या क्षेत्ररक्षणाची खास झलक दाखवून दिली. 'नो लूक शॉट'च्या जमान्यात साईनं 'नो लूक कॅच'सह मैफिल लुटली. त्याने घेतलेला अप्रतिम कॅच पाहून कॅरेबियन बॅटरसह भारतीय ड्रेसिंग रुममधील मंडळीही आश्चर्यचकीत झाल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
साईनं अशक्यप्राय असा झेल टिपत कॅम्पबेलच्या खेळीला लावला ब्रेक
भारतीय संघानं ठेवलेल्या डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी टॅगेनरीन चंद्रपॉल आणि जॉन कॅम्पबेल या जोडीनं वेस्ट इंडिजच्या डावाला सुरुवात केली. पहिल्या कसोटी सामन्याच्या तुलनेत जोडीनं चांगली सुरुवात केली. ही जोडी सेट झालीये, असे वाटत असताना रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला. आठव्या षटकातील पहिल्या चेंडूवर कॅम्बबेलनं खणखणीत चौकार मारून जड्डूचं स्वागत केलं. पण दुसऱ्या चेंडूवर तो फसला. जॉन कॅम्पबेल स्लॉग स्वीप शॉट मारला अन् शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या साईनं अशक्यप्राय असा झेल टिपत भारतीय संघाला पहिलं यश मिळवून देण्याता मोलाचा वाटा उचलला.
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
नजर हटवली, हाताला चेंडू लागून तो हेल्मेटवर आदळला अन्...
साई सुदर्शन हा क्रिकेटच्या मैदानातील सर्वात धोकादायक फिल्डिंग पोझिशनपैकी एक असलेल्या शॉर्ट लेगवर उभा होता. जड्डूच्या गोलंदाजीवर जॉन कॅम्पबेलनं मारलेला जोरदार फटका खेळला. जवळपास १५० kph वेगाने चेंडू साईच्या दिशनं आला. साईनं चेंडूवरील नजर हटवली, पण त्यातही योग्य अंदाज घेतला. चेंडू आधी हाताला लागला अन्हे ल्मटेवर आदळल्यावर पुन्हा साईच्या हातात विसावला. ही कसरत करताना साईला दुखापतीमुळे आउट केलेल्या बॅटरसोबतच मैदान सोडण्याची वेळ आली.