India vs West Indies 2nd ODI : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. विंडीजविरुद्ध भारताचा हा सलग १२ वा मालिका विजय ठरला. वेस्ट इंडिजला त्यांच्या घरच्या मैदानावर लोळवणारा शिखर धवन हा भारताचा पाचवा कर्णधार ठरला. अक्षर पटेल ( Axar Patel) हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ३ चेंडूंत ६ धावांची गरज असताना त्याने खणखणीत षटकार खेचून २ विकेट्स राखून भारताला विजय मिळवून दिला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. अक्षरने विजयी षटकार खेचल्यानंतर भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला. Dressing Room मधील सेलिब्रेशन तर भन्नाट होते. राहुल द्रविडही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला.
शे होप ( ११७), कर्णधार निकोलस पूरन ( ७४), कायले मेयर्स ( ३९) व शामार्ह ब्रुक्स ( ३५) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ६ बाद ३११ धावांचा डोंगर उभा केला. पदार्पणवीर आवेश खानची ( ६ षटकांत ५४ धावा) याची चांगली धुलाई झाली. शार्दूल ठाकूरही ( ७ षटकांत ५४ धाव) महागडा ठरला, परंतु त्याने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. दीपक हुडा, अक्षर पटेल व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( १३) व शुबमन गिल ( ४३) यांनी फार संथ सुरुवात केली. त्यात सूर्यकुमार यादवही (९) अपयशी ठरल्यानं भारताची अवस्था ३ बाद ७९ अशी झाली. यावेळेस संजू सॅमसन व श्रेयस अय्यर ही जोडी मैदानावर अडून बसली आणि त्यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली.
![]()
श्रेयस अय्यर ६३ आणि संजू ५४ धावांवर माघारी परतल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ पुनरागमन करताना दिसला. पण, दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अर्धशतकी भागीदारी करून पुन्हा गाडी रुळावर आणली. दीपक ३३ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलने ३५ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावांची खेळी केली. विजयासाठी ६ धावांची गरज असताना त्याने मिड ऑनच्या दिशेने खणखणीत षटकार खेचला अन् भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली.
या विक्रमी विजयानंतर भारतीय संघाने ड्रेसिंग रुममध्येही सैराट सेलिब्रेशन केलं..
Web Title: IND vs WI, 2nd ODI : Match-winning knock from Axar Patel, Team India CRAZY CELEBRATIONS Inside the DRESSING ROOM, Watch both Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.