ind vs sl live match । कोलंबो : आज आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने इतिहास रचत केवळ १६ चेंडूत ५ बळी घेतले. पहिल्या षटकांत जसप्रीत बुमराहने एक बळी घेतल्यानंतर सिराजने यजमानांना मोठे धक्के दिले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून एकाच षटकात चार बळी घेणारा मोहम्मद सिराज पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने पथुम निसंका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दासुन शनाका या पाच फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ -
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसंका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलालागे, दुशन हेमांथा, प्रमोद मधुशन, मथिक्ष्णा पथिराना.
Web Title: ind vs sl live match Mohammad Siraj has taken 5 wickets in just 16 balls in a historic performance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.