Join us

IND vs SL: अश्विनने मोडला कपिल देव यांचा विक्रम, भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज बनला

India vs Sri Lanka 1st Test: श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने कपिल देव यांना मागे टाकले, या रेकॉर्डच्या बाबतीत अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 15:04 IST

Open in App

मोहाली: भारतीय गोलंदाज आर अश्विनने श्रीलंकेविरोधात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. पहिल्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी अश्विनने कसोटीत क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत कपिल देव यांना मागे टाकले आहे. कपिल देव यांच्या नावे 334 विकेट होत्या, तर अश्विनने 335 विकेट घेऊन त्यांना मागे टाकले आहे.

अनिल कुंबळ अव्वलआतापर्यंत कपिल देव भारताचे दुसरे सर्वात यशस्वी गोलंदाज होते. पण, आता अश्विन दुसरा यशस्वी गोलंदाज बनला आहे. सध्या माजी गोलंदाज अनिल कुंबळे 619 विकेटसह भारताचे कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहेत. दरम्यान,पहिल्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. भारताने पहिला डाव 8 बाद 574 धावा करून घोषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात केवळ 174 धावाच करू शकला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पाहुण्या संघाला फॉलोऑन दिला.

अश्विन 9व्या क्रमांकावर भारताचे माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज कपिल देव यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्यांनी 23 वेळा 5 विकेट्स आणि दोन वेळा 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. तर, आर अश्विनची ही 85वी कसोटी आहे. त्याने आतापर्यंत 435 विकेट घेतल्या आहेत. यात त्याने 30 वेळा 5 आणि 7 वेळा 10 विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन सध्या 9व्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन 800 बळींसह अव्वल स्थानावर आहे.

वनडेमध्ये 150+ विकेट्स 

35 वर्षीय आर अश्विनने वनडेमध्ये 150 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यापूर्वी त्याने 84 कसोटीत 430 विकेट घेतल्या होत्या. तर, 5 शतके आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 2800 हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच, वनडेच्या 113 सामन्यात 151 विकेट्स घेतल्या आहेत. 25 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्‍याने टी-20 आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये 61 विकेट्स घेतल्या आहेत.

टॅग्स :आर अश्विनकपिल देवश्रीलंकाभारतीय क्रिकेट संघ
Open in App