IND vs SL 1st T20I Predicted Playing 11: नववर्षाची सुरूवात विजयानं करण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते प्लेईंग ११

IND vs SL 1st T20I Predicted Playing 11: आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 11:24 IST2023-01-03T11:23:33+5:302023-01-03T11:24:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SL 1st T20I Predicted Playing 11 A chance to start the New Year with a win could be the playing 11 against Sri Lanka | IND vs SL 1st T20I Predicted Playing 11: नववर्षाची सुरूवात विजयानं करण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते प्लेईंग ११

IND vs SL 1st T20I Predicted Playing 11: नववर्षाची सुरूवात विजयानं करण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते प्लेईंग ११

IND vs SL 1st T20I Predicted Playing 11: आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्याला संध्याकाळी सात वाजता सुरूवात होईल. टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलंय. रोहित शर्मा सध्या अनफिट असल्यानं तो दिसणार नसला तरी नव्या वर्षाची विजयानं सुरूवात करण्याची संधी टीम इंडियाकडे असेल.

भारतीय टी २० स्क्वाडमध्ये अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेकडे पाहता त्यांची निवड करण्यात आलीये. शुभमन गिलही यापैकी एक आहे. तो १३ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळला आहे. परंतु टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्यानं डेब्यू केलेला नाही. त्यामुळे गिलला आजच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. मीडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि दीपक हुड्डा फलंदाजी करू शकतात.

भारतीय संघाकडून गोलंदाजीची सुरूवात अर्शदीप सिंग करण्याची शक्यता आहे. उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांचीदेखील त्याला साथ मिळू शकते. तसंच फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर हेदेखील प्लेईंग ११ चा भाग असू शकतात.

संभाव्यसंघ
ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड/शुभमन गिल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग

Web Title: IND vs SL 1st T20I Predicted Playing 11 A chance to start the New Year with a win could be the playing 11 against Sri Lanka