IND vs SA Virat Kohli Arrives In India Ahead Of South Africa ODI Series : कसोटी मालिकेनंतर घरच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी विराट कोहली मायदेशी परतला आहे. कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधील निवृत्तीनंतर कोहली इंग्लंडमध्ये बस्तान मांडले आहे. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी तो मायदेशात परतल्याचे पाहायला मिळाले होते. विराट कोहली रांचीमध्ये पोहोचला असून बिरसा मुंडा विमानतळावर त्याचे स्वागत करण्यात आले. ३० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेचा तो भाग आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट कोहलीचा एअरपोर्ट लूक ठरतोय लक्षवेध
विराट कोहली लंडनहून थेट मुंबई विमानतळावर पोहचला. कोहलीनं व्हाईट टी शर्टवर ओव्हरसाइज्ड शर्टसह काळ्या रंगातील सनग्लासेस आणि कॅपसह लूक परिपूर्ण केला होता. मायदेशी परतल्यावर कोहली बंगळुरुला जाणार का? अशी चर्चा होती. पण कोहलीनं थेट रांचीची फ्लाइट पकडल्याचे पाहायला मिळाले. मुंबई विमानतळावरील स्टायलिश लूकनंतर रांची विमानतळावरील त्याची झलक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
परफेक्ट फॅमिली मॅन होण्यासाठी मध्यममार्ग निवडला
२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर छोट्या फॉरमॅटमध्ये निवृत्ती घेतल्यावर इंग्लंड दौऱ्याआधी विराट कोहलीनं मोठ्या फॉरमॅटमधूनही निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. परफेक्ट फॅमिली मॅन होण्यासाठी किंग कोहलीनं मध्यममार्ग स्वीकारत फक्त वनडे खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यात तो संघर्ष करताना दिसला. पण तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत नाबाद अर्धशतकी खेळीसह त्याने आपला क्लास दाखवला होता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत तो धमाका करण्यासाठी तयार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेत विराट कोहलीचा रेकॉर्ड दमदार आहे. सचिन तेंडुलकर पाठोपाठ भारत-दक्षिण आफ्रिका वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. रांचीच्या मैदानात छोट्याखानी खेळीसह तो दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस याला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहचू शकतो. कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या ३१ वनडे सामन्यातील २९ डावात १५०४ धावा केल्या आहेत. ८ अर्धशतकासह त्याच्या खात्यात पाच शतके जमा असून नाबाद १६० ही दक्षिण आफ्रिकेविरुद्धची त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. सचिन तेंडुलकर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्तानी असला तरी कोहली सरासरीच्या बाबतीत नंबर वन आहे. घरच्या मैदानताील मालिकेत एका शतकी खेळीसह तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक शतके झळकवणारा भारतीय होऊ शकतो.