Join us

३ रणजी सामन्यात १५ विकेट्स! तरीही BCCI निवडकर्त्यांनी शमीला दाखवली ‘नो एन्ट्री’ची पाटी

रणजी सामन्यात चमकला, ३ सामन्यात १५ विकेट्स तरी निवडकर्त्यांनी दाखवला नाही भरवसा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 23:54 IST

Open in App

IND vs SA Test Squad  2025 Mohammed Shami Test Career Is Over : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या संघात मोजके बदल झाले, पण यावेळीही मोहम्मद शमीला काही संघात स्थान मिळालेले नाही. २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दुखापतीतून संघाबाहेर गेल्यावर जवळपास वर्षभरानंतर  मोहम्मद शमीनं क्रिकेटच्या मैदानात पदार्पण केलं. पण आता तो संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

BCCI नं शमीसाठी लावलीये 'नो एन्ट्री'ची पाटी

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये तो टीम इंडियातून खेळला आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आघाडीच्या चारमध्ये राहून त्याने खास छाप सोडली. पण त्यानंतर तो शंभर टक्के फिट दिसत नाही, असे कारण देत BCCI निवडकर्त्यांनी शमीसाठी टीम इंडियात नो एन्ट्रीची पाटीच लावल्याचे दिसते. इंग्लंड दौऱ्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत संघात स्थान न मिळाल्यावर शमीनं नाराजी व्यक्त केली होती. रणजी सामन्यासाठी फिट आहे मग टीम इंडियासाठी अनफिट कसा? असे त्याने स्पष्ट बोलून दाखवले. आता पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसते.

India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?  रणजी सामन्यात चमकला, ३ सामन्यात १५ विकेट्स तरी निवडकर्त्यांनी दाखवला नाही भरवसा  

मनातील खंत व्यक्त करून शमी गप्प बसला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रणजी करंडक स्पर्धेत तो बंगालच्या संघाकडून मैदानात उतरला. ३५ वर्षीय अनुभवी गोलंदाजाने आपली सर्व ताकदपणाला लावून ३  सामन्यात १५ विकेट्स घेतल्या. ९३ षटके गोलंदाजी करतानाना त्याने फिटनेससह फॉर्मही दाखवला. पण तरीही निवडकर्त्यांना त्याच्यावर भरवसा दाखवलेला नाही. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शमीवर पुन्हा अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरही उमटताना दिसत आहेत.  

 BCCI नं शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद केले?

शमीच्या निवडीसंदर्भात नेहमीचआश्चर्यचकित करणारे निर्णय घेण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत शमीला संघात स्थान मिळाले. पण पहिल्या चार सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीच मिळाली नव्हती. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यावर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये आला अन् त्यानं संधीचं सोनं करत या स्पर्धेत लेट एन्ट्री मारून सर्वाधिक विकेट्स घेऊन आपल्यातील क्षमता दाखवली. या स्पर्धेत तो घोट्याला झालेल्या दुखापतीनंतर इंजेक्शन घेऊन खेळला होता. परिणामी त्याच्यावर स्पर्धा संपल्यावर क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहण्याची वेळ आली. फिटनेस सिद्ध करत तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळला पण आता पुन्हा तो संघाबाहेर पडला आहे. सध्याच्या घडीला त्याच्याबाबतीत जे घडतं आहे ते BCCI नं त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत का? असा प्रश्न निर्माण करणारे आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Despite wickets, Shami sidelined; BCCI selectors deny entry for him.

Web Summary : Despite proving fitness and form with 15 Ranji wickets, Shami remains excluded from the South Africa Test squad. Selectors seemingly distrust him, raising questions about his future with Team India after previous surprising decisions and injuries.
टॅग्स :मोहम्मद शामीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय