IND vs SA Team India Super 8 Loss Sanjay Manjrekar Says Thanks To South Africa : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ च्या लढतीत भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावल्यानंतर टीम इंडियाच्या उणीवा समोर आल्या. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात मोठ्या पराभवावर काही माजी क्रिकेटर्संनी खेळाडूंचा सामन्यातील दृष्टीकोन आणि प्लेइंग इलेव्हनमधील रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. त्यात संजय मांजरेकर थेट दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे आभार मानत टीम इंडियाला सल्ला दिला आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यावर संजय मांजरेकरांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं ते काय म्हणाले? या धक्क्यातून सावरण्यासाठी काय करायला हवे? असे त्यांना वाटते, जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकं काय म्हणाले मांजरेकर?
संजय मांजरेकर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे आभार मानत असे म्हटले आहे की, "त्यांच्यामुळे आता आपल्याला काय सुधारण्याची गरज आ आहे हे स्पष्ट झाले." दमदार कमबॅक करण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण बदल गरजेचे असून कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायलाच पाहिजे, असे मत मांजरेकरांनी व्यक्त केले आहे.
मोठ्या पराभवानंतर टीम इंडियात बदलाचे संकेत! संजू सॅमसन संदर्भातील प्रश्नावर कोचने असं दिलं उत्तर
मांजरेकरांनी या ३ गोष्टींवर भर देण्याचा दिला सल्ला
- आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी न करता फिरकी गोलंदाजांसमोर संयम आणि धैर्य दाखवण्याची गरज आहे.
- उर्वरित दोन सामन्याआधी भारतीय संघाने स्लोअर चेंडूचा अधिक सराव करायला हवा. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने याच पॅटर्नसह टीम इंडियाच्या फलंदाजांना बॅकफूटवर ढकलले होते.
- कुलदीप यादवला संधी दिली तर तो विकेट मिळवून देण्यासाठी अतिरिक्त पर्याय ठरेल. याचा टीम इंडियाला फायदा होईल, असेही संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे.
एक पराभव अन् सेमीफायनलचा मार्ग खडतर होण्याची भीती
दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय संघासाठी सेमीच समीकरण अवघड झाले आहे. उर्वरित दोन सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळून टीम इंडियाला आता इतर संघांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे. २६ फेब्रुवारीला भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध सुपर ८ मधील दुसरा सामना खेळणार असून १ मार्चला भारतीय संघ या फेरीतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळणार आहे.