IND vs SA Team India Playing 11 Dhruv Jurel To Replace Nitish Reddy : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या सामन्यात सामन्यात भारतीय संघ दोन विकेट किपरसह मैदानात उतरणार ही गोष्ट आता एकदम स्पष्ट झाली आहे. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन नील टेन डोशेट यांनी यासंदर्भातील मोठा खुलासा केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नितीश कुमार रेड्डीचा पत्ता कट, ध्रुव जुरेल प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम राहणार
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याआधी टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षकांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील गेम प्लॅनसंदर्भातील खास गोष्ट शेअर केली आहे. ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ध्रुव जुरेल कायम राहिल, अशी माहितीही त्यांनी दिली.
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
बऱ्याच वर्षांनी दोन विकेट किपर बॅटरसह मैदानात उतरणार टीम इंडिया
वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत ध्रुव जुरेल विकेट किपर बॅटरच्या रुपात संघात खेळला होता. दुसऱ्या बाजूला नितीश कुमार रेड्डीही संघाचा भाग होता. रिषभ पंत संघात परतल्यावर ध्रुव जुरेलला फलंदाजाच्या रुपात खेळवण्याला भारतीय संघ पसंती देणार का? अशी चर्चाही रंगली होती. अखेर ऑलराउंडरला बाहेरचा रस्ता दाखवत ध्रुव जुरेल याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. त्यामुळे १९८६ नंतर पहिल्यांदा भारतीय संघ कसोटी सामन्यात दोन प्रमुख विकेट किपर बॅटरच्या रुपात मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
काय म्हणाले टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक?
बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन नील टेन डोशेट म्हणाले की, "जर ध्रुव जुरेल आणि पंत एकत्र खेळताना दिसले नाहीत तर ते आश्चर्यचकीत करणारे ठरेल. ध्रुव मागील सहा महिन्यांपासून सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. मागच्या आठवड्यात त्याने बंगळुरुच्या मैदानात दोन शतके झळकावली आहेत. त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार हे निश्चित आहे."