ir="ltr">Karun Nair on Team India batting collaspe, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला फलंदाजीमध्ये मोठा धक्का बसला. बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजी संघाची धावसंख्या १ बाद ९५ वरून सर्वबाद २०१ अशी झाली. मधल्या फळीच्या घसरगुंडीमुळे संघाची चिंता वाढली. याचदरम्यान, भारतीय फलंदाज करुण नायरने एक सूचक सोशल मीडिया पोस्ट केली आणि ती चर्चेचा विषय ठरली.
करुण नायरची सूचक पोस्ट व्हायरल
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय डावाची सुरुवात चांगली झाली, पण त्यानंतर सर्व काही बिघडले. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ६५ धावा जोडल्या आणि त्यानंतर भारताने एका विकेटच्या मोबदल्यात ९५ धावा केल्या. पण त्यानंतर, भारतीय फलंदाजीला गळती लागली. घरच्या मैदानावर टीम इंडियाच्या फलंदाजी दुर्दशा झाली आणि करुण नायरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. करुण नायरने X वर एक पोस्ट शेअर केली. त्यात लिहिले की, "काही वेळा परिस्थिती तुम्हाला माहिती असते आणि तुम्ही तिथे नसल्याने तुम्ही काहीही करूही शकत नाहीत. तुम्हाला शांत राहावे लागले. तशाप्रकारची शांतता एक वेगळीच वेदना देऊन जाते."
चाहते करुण नायरच्या या गूढ पोस्टला टीम इंडियाच्या खराब कामगिरीशी जोडत आहेत. करुण नायर गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. पण या मालिकेसाठी त्याची टीम इंडियासाठी निवड झाली नाही. या वर्षी इंग्लंड दौऱ्यादरम्यान करुण नायर भारतीय कसोटी संघात परतला होता. त्याला जवळजवळ आठ वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. पण हा दौरा त्याच्यासाठी चांगला ठरला नाही. त्यामुळे त्या मालिकेनंतर त्याला वगळण्यात आले.
Web Title : IND vs SA: टीम इंडिया की बल्लेबाजी का पतन, करुण नायर का पोस्ट
Web Summary : दक्षिण अफ्रीका के खिलाफ दूसरे टेस्ट में भारत की बल्लेबाजी लड़खड़ाई। करुण नायर की रहस्यमय सोशल मीडिया पोस्ट ने टीम चयन के बारे में अटकलों को हवा दी।
Web Title : India's batting collapse, Karun Nair's cryptic post after IND vs SA.
Web Summary : India's batting woes in the second Test against South Africa spark concern. Karun Nair's cryptic social media post fuels speculation about team selection.