Jitesh Sharma Equals MS Dhoni Record : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी विक्रमांची बरसात केली. हार्दिक पांड्याने तुफान फलंदाजीचा नजराणा पेश करताना आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात षटकारांचे शतक साजरे केले. गोलंदाजीत जप्रीत बुमराहनं १०० विकेट्सचा पल्ला गाठला. एवढेच नाही तर भारतीय संघाने १०१ धावांनी विजय मिळवल्यावर सूर्युकमार यादव हा टी-२०त सर्वाधिक ५ वेळा १०० पेक्षा अधिक धावांनी संघाला विजय मिळवून देणारा पहिला आणि एकमेव कर्णधार ठरला. याशिवाय संजू सॅमसनच्या जागी विकेट किपर बॅटरच्या रुपात पहिली पंसती देण्यात आलेल्या जितेश शर्मानंही विक्रमी 'चौकार' लगावला. त्याने थेट धोनीच्या खास विक्रमाशी बरोबरी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जितेश शर्मानं साधला मोठा डाव; MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जितेश शर्मा याने विकेटमागे ट्रिस्टन स्टब्स, डेविड मिलर, डोनोवन फरेरा आणि केशव महाराज यांची शिकार करत धोनीच्या खास विक्रमाशी बरोबरी साधली आहे. कमालीचा योगायोग म्हणजे धोनीनं ज्या मैदानात एका टी-२० सामन्यात विकेटमागे चार गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला होता त्याच मैदानात जितेश शर्मानं त्याच्या रेकॉर्डची बरोबरी साधली. MS धोनीनं २०१७ मध्ये कटकच्या मैदानातील श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात २ झेल आणि २ स्टंपिंगसह चौघांना बाद केले होते. टी-२० मध्ये MS धोनीची विकेटमागे ५ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे. पण घरच्या मैदानातील धोनीनं एका सामन्यात ४ विकेट्सचा रेकॉर्ड होता. याच रेकॉर्डशी जितेश शर्मानं बरोबरीचा डाव साधला आहे.
हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडबद्दल मनातलं उघडपणे बोलला; ती म्हणाली ‘तुझ्यासारखा कोणीच नाही, राजा!’
T20I मध्ये भारताकडून विकेटमागे सर्वाधिक बळी टिपणारे यष्टीरक्षक
५ - एमएस धोनी (विरुद्ध इंग्लंड) - ब्रिस्टल, २०१८ (५ झेल)
४ - एमएस धोनी (विरुद्ध अफगाणिस्तान) - सेंट लूसिया, २०१० (४ झेल)
४ - एमएस धोनी (विरुद्ध पाकिस्तान) - कोलंबो आरपीएस, २०१२ (४ झेल)
४ - एमएस धोनी (विरुद्ध श्रीलंका) - कटक, २०१७ (२ झेल, २ यष्टीचित)
४ - दिनेश कार्तिक (विरुद्ध इंग्लंड) - साउथेम्प्टन, २०२२ (३ झेल, १ यष्टीचित)
4 - जितेश शर्मा (विरुद्ध दक्षिण आफ्रिका) - कटक, २०२५ (४ झेल)