Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA : हार्दिक पांड्या शंभर टक्के फिट! गिल टी-२० मालिकेलाही मुकणार?

हार्दिक पांड्या फिट; टीम इंडियात कमबॅक करण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 19:54 IST

Open in App

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्यांच्या वनडे मालिका सुरु आहे. त्यानंतर दोन्ही संघ ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळताना दिसतील. ९ डिसेंबरपासून रंगणाऱ्या या मालिकेतून हार्दिक पांड्या पुन्हा भारतीय संघाकडून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात उतरुन पांड्या आगामी टी-२० मालिकेसाठी तयारी करेल. टी-२० संघाचा उप कर्णधार शुभमन गिलच्या खेळण्यावर मात्र संभ्रम कायम आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गिलच्या फिटनेसचं काय?

भारताच्या टी-२० संघाचा उप-कर्णधार शुभमन गिल याची अनिवार्य फिटनेस चाचणी घेण्यात येणार आहे. बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये फिटनेस चाचणीच्या रिपोर्टसवरुन तो खेळणार की, नाही यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. कोलकाता कसोटी सामन्यात मानेच्या दुखापतीनंतर शुभमन गिल कसोटी मालिकेसह वनडे मालिकेलाही मुकला आहे. टी-२० मालिकेत खेळण्यावरही संभ्रम कायम आहे.

IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...

इंजेक्शन दिल्यावर २१ दिवसांची विश्रांती, पण...

पीटीआयने  बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, मानेच्या दुखापतीनंतर गिलला इंजेक्शन देण्यात आले होते आणि त्याला २१ दिवस विश्रांती व रिहॅबची सूचना करण्यात आली होती. यामध्ये दुखापतीमुळे प्रभावित झालेल्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी खास व्यायामांचा समावेश होता. ट्रेनिंगदरम्यान स्पोर्ट्स सायन्स टीम त्याच्या हालचालींचे मूल्यांकन करेपर्यंत काहीही सांगता येत नाही. फलंदाजी करताना त्याला अजूनही अस्वस्थता आहे का, याचीही खात्री नाही.” त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी गिलच्या पुनरागमनाची शक्यता ५० टक्के इतकीट आहे

हार्दिक पांड्या फिट

भारतीय चाहत्यांसाठी चांगली बातमी म्हणजे हार्दिक पंड्याला टी-२० फॉरमॅटमध्ये परतण्याची परवानगी मिळाली आहे. पांड्याला टी-२० खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली असून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतून तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी बडोदा संघाकडून तो किमान दोन टी-२० सामने खेळेल, अशी माहिती समोर येत आहे.२१ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात हार्दिक सेंटर ऑफ एक्सलन्सबाहेर गेलेलाच नाही. त्याने सर्व रिहॅब आणि ‘रिटर्न टू प्ले’ प्रोटोकॉल पूर्ण केले आहेत. त्याला टी-२०मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करण्याची पूर्ण परवानगी मिळाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hardik Pandya 100% Fit, Will Gill Miss T20 Series?

Web Summary : Hardik Pandya is set to return for the T20 series against South Africa after proving his fitness. Shubman Gill's participation is uncertain due to a neck injury. He will undergo a fitness test to determine his availability. Pandya will play in the Syed Mushtaq Ali Trophy to prepare.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहार्दिक पांड्याशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघ