IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 10:35 IST2025-12-12T10:34:13+5:302025-12-12T10:35:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SA: South Africa's great feat, becoming the first team to win the most T20 matches against India | IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ

IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह भारताच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताने एकूण २०१ सामने गमावले असून त्यांनी सर्वाधिक सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संघासमोर गमावले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध प्रत्येकी १२ सामने गमावले आहेत. 

आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत एकूण ३३ सामने खेळले आहेत. त्यापैकी, एकूण १३ सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलिया (एकूण सामने-३७) आणि इंग्लंड (एकूण सामने-२९) यांच्याविरुद्ध प्रत्येकी १२ सामने गमावले आहेत. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजविरुद्ध टी-२० सामन्यात भारताला प्रत्येकी १० सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

भारताचा लाजिरवाणा पराभव

द.आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला ५१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २० षटकांत चार विकेट्स गमावून २१३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डीकॉकने ४६ चेंडूत ९० धावांची धमाकेदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली. भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा (६२ धावा) व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे भारताचा पराभव झाला. या पराभवासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबर रोजी खेळला जाईल.

पराभवानंतर सूर्यकुमार काय म्हणाला?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादव म्हणा की, "या सामन्यात आम्ही प्रथम गोलंदाजी केली. परंतु, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखू शकलो नाही. यातून शिकले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. मला वाटते की, शुभमन आणि मला फलंदाजीची जबाबदारी घ्यावी लागेल, कारण आपण नेहमीच अभिषेकवर अवलंबून राहू शकत नाही, कारण त्याचाही दिवस वाईट ठरू शकतो. शुभमन, मी आणि इतर फलंदाजांना ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. आपण या चुकांमधून शिकले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे."

Web Title : दक्षिण अफ्रीका ने भारत को हराया, भारत के खिलाफ सर्वाधिक टी20 जीत।

Web Summary : दूसरे टी20 में भारत दक्षिण अफ्रीका से हार गया, जिससे उनके खिलाफ सबसे ज्यादा टी20 हार का रिकॉर्ड बन गया। तिलक वर्मा के प्रयास के बावजूद, भारत दक्षिण अफ्रीका के 213 रनों का पीछा करने में विफल रहा। सूर्यकुमार ने हार के बाद बल्लेबाजों को जिम्मेदारी लेने की आवश्यकता पर जोर दिया।

Web Title : South Africa defeats India, most T20 wins against India.

Web Summary : India lost to South Africa in the second T20, marking a record of most T20 losses against them. Despite Tilak Verma's effort, India fell short chasing South Africa's 213. Suryakumar emphasized the need for batsmen to take responsibility after the defeat.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.