IND vs SA Ruturaj Gaikwad Maiden Century : भारतीय संघात दोन वर्षांनी कमबॅकची संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाडनं संधीचं सोनं करुन दाखवलं आहे. पहिल्या डावात अल्प धावसंख्येवर तंबूत फिरलेल्या पुणेकरानं दुसऱ्या वनडे सामन्यात आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिली वहिली सेंच्युरी झळकावली आहे. ७७ चेंडूवर खणखणीत चौकार ठोकत त्याने शतक पूर्ण केले. ऋतुराज गायकवाड हा व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये सलामीवीराच्या रुपात खेळतो. आतापर्यंतच्या कारकि्दीत त्याने तिसऱ्या क्रमांकापेक्षा खालच्या क्रमांकावर कधीच फलंदाजी केलेली नाही. पण यावेळी टीम इंडियात संधी मिळाल्यावर त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले. या क्रमांकावरही त्याने आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे.