भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूरच्या मैदानात खेळवण्यात आला. पाहुण्या संघाने विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करत मालिकेत बरोबरीचा डाव साधला. या सामन्यात किंग कोहली, ऋतुराज गायकवाड आणि मार्करम या तीन शतकवीरांनी मैफील लुटली. मैदानातील खेळाडूंच्या कामगिरीशिवाय काही हलके फुलके क्षणची चर्चेचा विषय ठरत आहेत. यात पहिल्या दोन्ही सामन्यात बाकावर बसलेला रिषभ पंत आणि दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माचा डगआउटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित-पंत यांच्यातील खास बॉन्डिंग दाखवणारा खास क्षण
रिषभ पंत आणि रोहित यांच्यातील कमालीचे बॉन्डिंग दाखवणारा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हायरल व्हिडिओत रोहितच्या पापणीतून पडणारा केस रिषभ पंत चिमटीत धरतो. एवढेच नाही तर हा केस रोहितच्या हातावर ठेवून विकेट किपर बॅटर आपल्या माजी कर्णधाराला विश माग असे सांगताना दिसते. रोहित शर्माही त्याची इच्छा पूर्ण करत आपल्या मनातील इच्छेसह हातावर ठेवलेल्या पापणीच्या केसावर फुंकर मारताना दिसून येते. रोहितने डोळे मिटून हसतच मनातली इच्छा व्यक्त केली आणि हा हलकाफुलका क्षण लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
समालोचकांनीही केली 'बोलंदाजी'
रिषभ पंत आणि रोहित शर्मा यांच्यातील हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्यावर समालोचन करणारी मंडळीही याकडे आकर्षित झाली. एवढेच नाही तर कॉमेंट्री बॉक्समध्ये रोहितनं काय मागितले असेल, यावर चर्चा सुरु झाली. रोहित शर्मानं एकतर पुढच्या सामन्यातील शतकी खेळीची विश मागितली असेल नाहीतर आगामी वर्ल्डकप संदर्भात तो मनातली गोष्ट बोलला असेल, असा निष्कर्ष कॉमेंट्री बॉक्समधील मंडळींना काढल्याचेही पाहायला मिळाले.