Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?

जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर स्टोरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:47 IST2025-12-04T14:34:14+5:302025-12-04T14:47:47+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SA Rinku Singh Dropped From Team India T20I Squad Despite Brilliant Record Cricketer And Priya Saroj's Wedding Reason Behind Or Anything Else | Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?

Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?

IND vs SA Rinku Singh Dropped From Team India T20I Squad : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे मालिका सुरु असताना दोन्ही संघातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील ५ सामन्यांच्या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली निवडलेल्या १५ सदस्यीय संघात रिंकू सिंह याचा समावेश करण्यात आलेला नाही. क्रिकेट जगतात फिनिशरच्या रुपात खास छाप सोडणाऱ्या रिंकू सिंहवर वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न  ओढावले की, लग्नाच्या पार्श्वभूमीवर त्याला सुट्टी देण्यात आलीये? असा प्रश्न चाहत्यांना पडू शकतो. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर स्टोरी 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आधी बाकावर बसवले, थेट फायनलमध्ये मिळालेल्या संधीच सोनं केलं, आता तो थेट संघाबाहेर

आशिया कप टी-२० स्पर्धेत रिंकू सिंह भारतीय संघाचा भाग होता. पण साखळी फेरीत एकाही सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. फायनलमध्ये हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. भारतीय संघाला आशियाई चॅम्पियन करणारी धावही त्याच्या बॅटमधून आली. पण आता ९ डिसेंबरपासून रंगणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतून त्याला संघाबाहेर काढण्यात आलं आहे. ही मालिका आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेच्या शर्यतीतून त्याचा पत्ता कट झालाय का? असा प्रश्नही आता निर्माण होत आहे.

India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!

रिंकू सिंहचा रेकॉर्ड एकदम झक्कास

IPL मध्ये धमाकेदार खेळी करुन २०२३ मध्ये टीम इंडियात एन्ट्री मारणाऱ्या रिंकू सिंह याने आतापर्यंत ३५ टी-२० सामन्यात ५५० धावा केल्या आहेत. ४२ च्या सरासरीसह १६१.७६ च्या सरासरीनं धावा करताना त्याच्या भात्यातून ३ अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. बहुतांश वेळा छोट्याखानी खेळीसह संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलताना त्याने ४६ चौकार आणि ३१ षटकार मारले आहेत.  

वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? तो संघाबाहेर होण्यामागचं नेमकं कारण काय?

रिंकू सिंह हा मैदानातील आपल्या कामगिरीशिवाय वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळेही चर्चेत आहे. या क्रिकेटरनं समाजवादी पार्टीच्या विद्यमान खासदार असलेल्या प्रिया सरोज हिच्यासोबत साखरपुडा उरकला आहे. नोव्हेंबरमध्ये तो लग्नबंधनात अडकणार होता. पण त्याच्या लग्नाची तारीख कौटुंबिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. आता वर्ल्ड कप स्पर्धेआधी तो लग्न उरकणार असल्यामुळे त्याला तयारीसाठी सुट्टी देण्यात आली आहे की, त्याला संघाबाहेर ठेवून संघ व्यवस्थापन अधिक अष्टपैलू खेळाडूंसह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ बांधणी करण्याचा विचार करत आहे? हा प्रश्न निर्माण होता. ज्याचे उत्तर सध्यातरी गुलदस्त्यातच आहे.
 

Web Title : रिंकू सिंह बाहर: विश्व कप बाधा या शादी की शहनाई?

Web Summary : रिंकू सिंह को टी20 टीम से बाहर किए जाने पर सवाल उठे। क्या यह शादी की तैयारी या विश्व कप रणनीति के कारण था? प्रभावशाली प्रदर्शन के बावजूद, उनकी अनुपस्थिति टीम चयन और भविष्य की योजनाओं पर बहस छेड़ती है।

Web Title : Rinku Singh dropped: World Cup hurdle or wedding bells?

Web Summary : Rinku Singh's exclusion from the T20I squad raises questions. Was it due to wedding preparations or World Cup strategy? Despite impressive IPL and national team performances, his absence sparks debate about team selection and future plans.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.