IND vs SA: भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटची मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ पराभवाच्या छायेत आहे. न्यूझीलंड पाठोपाठ दक्षिण आफ्रिका टीम इंडियाला क्लीन स्वीप देण्याच्या उंबरठ्यावर असताना भारतीय संघातील अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजानं अजब गजब वक्तव्य केले आहे. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राखण्यात यशश्वी ठरलोत तर ते आमच्यासाठी जिंकल्यासारखेच असेल, अशा आशयाचे वक्तव्य जड्डूनं केले आहे. सोशल मीडियावर त्याचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उभारली विक्रमी धावसंख्या
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघासमोर ५४९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कसोटीच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही पाहुण्या संघाने भारतीय मैदानात एवढे मोठे टार्गेट सेट केल्याची ही पहिली वेळ ठरली. त्यामुळे गुवाहाटी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या टीम इंडियावर दुसऱ्या सामन्यात पराभव टाळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. गोलंदाजांसह फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय संघ संकटात असताना रवींद्र जडेजानं पराभव टाळण्याचे भाष्य करताना जिंकण्याची हास्यास्पद भावना व्यक्त केली आहे.
Yashasvi Jaiswal : खेळ मांडला! यशस्वीला गोलंदाजीची हाव; फलंदाजी वेळी मात्र आपली जबाबदारी विसरला!
नेमकं काय म्हणाला जडेजा?
एका क्रिकेटरच्या रुपात कोणत्याही कसोटी मालिकेत त्यात घरच्या मैदानात पराभूत व्हावे, वाटत नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवाचा आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणताही प्रकारचा परिणाम होणार नाही. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी आम्ही बचावात्मक खेळ करून सामना अनिर्णत राखण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू. आम्ही अखेरचा दिवस खेळून काढला तर युवा टीम इंडियासाठी ही विन विन सेच्युएशन ठरेल, असे जडेजानं म्हटले आहे.
घरात घुसून मारल्याची गोष्ट सांगत टॉसचा मुद्दाही मांडला
२०१९ मध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानात ३-० अशी मात दिली होती. सध्याच्या परिस्थिती अगदी याउलट आहे. त्यावेळीच्या संघात आणि आताच्या भारतीय संघात फार मोठा बदल झाला आहे, असे वाटत नाही. त्यावेळी आम्ही सर्व सामन्यात नाणेफेक जिंकली होती. यावेळी दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकली, असे म्हणत या मालिकेत टॉसमुळे मॅच फिरली, अशा आशयाचे वक्तव्यही त्याने केले आहे.