Virat Kohli Century Break Sachin Tendulkar Record Most Hundreds In ODI : रनमशिन विराट कोहलीनं रांचीच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात विक्रमी शतक झळकावले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने वनडे कारकिर्दीतील ५२ वे शतक झळकावले. या खेळीसह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. सचिन तेंडुलकरनं आपल्या वनडे कारकिर्दीतील ४६३ सामन्यात ५१ शतके झळकाल्याचा रेकॉर्ड आहे. हा विक्रम मागे टाकत विराट कोहली वनडेतील शतकी किंग ठरला आहे. विराट कोहलीनं ३०७ व्या वनडे सामन्यातील २९५ व्या डावात हा मोठा विक्रम आपल्या नावे केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अबतक ८३! एका फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड
विराट कोहलीचे आंतरारष्ट्रीय कारकिर्दीतील हे ८३ वे शतक ठरले. वनडेतील ५२ शतकांशिवाय कसोटीत त्याने ३० शतके झळकावली आहेत. टी-२० क्रिकेटमध्येही त्याच्या खात्यात एका शतकाची नोंद आहे. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतकांचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. वनडेतील ४९ शतकासह तेंडुलकरनं कसोटीत ५१ शतके झळकावली आहेत. कसोटीतील ५१ शतकासह सचिन तेंडुलकरच्या नावे क्रिकेटच्या एका प्रकारात सर्वाधिक शतके झळकवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड होता. किंग कोहलीनं वनडे सर्वाधिक ५२ शतकांसह एका फॉरमॅचमध्ये सर्वाधिक शतकांचा तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.
IND vs SA : MS धोनीच्या घरच्या मैदानात 'रो-को'नं रचला इतिहास! सचिन-द्रविड जोडीचा महारेकॉर्ड मोडला
वनडेत सर्वाधिक शतक झळकवणारे फलंदाज
वनडेत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या यादीत तीन भारतीय आहेत. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरशिवाय रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि सनथ जयसूर्या यांचा नंबर लागतो.
- विराट कोहली. ५२ शतके
- सचिन तेंडुलकर- ४९ शतके
- रोहित शर्मा - ३३ शतके
- रिकी पाँटिंग- ३० शतके
- सनथ जयसूर्या- २८ शतके