टी-२० वर्ल्ड कपच्या यंदाच्या हंगामातील साखळी फेरीत भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करुन दाखवली. सलग चार विजयासह वर्ल्ड कप स्पर्धेत सलग १२ विजय नोंदवण्याचा खास विक्रम टीम इंडियाने आपल्या नावे केला. आता सुपर ८ मध्ये भारतीय संघ अहदमबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गत उविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भिडणार आहे. या सामन्यात अभिषेक शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवणार का? हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण युवा स्फोटक बॅटर तिन्ही सामन्यात खाते उघडण्यात अपयशी ठरला आहे. त्याचा खराब फॉर्म ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब ठरताना दिसते. टीम इंडियाच्या ताफ्यातही याबद्दल चर्चा सुरु असल्याचे बोलले जात होते. यावर भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अभिषेक शर्मासंदर्भात काय म्हणाले प्रशिक्षक?
भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल (Morne Morkel) यांनी सांगितले की, संघात आतापर्यंत अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याच्या खराब फॉर्मबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ मध्ये अभिषेक शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. प्रेक्षकांनाही त्याची आक्रमक फलंदाजी आवडते. तो चेंडू टाइम करत आहे. एक चांगली सुरुवात त्याला वेग पकडून देण्यास पुरेशी ठरेल, असे म्हणत अभिषेक शर्माचे जुने रुप पुन्हा पाहायला मिळेल, असा विश्वास गोलंदाजी प्रशिक्षाकाने व्यक्त केला आहे.
गंभीरसोबत चर्चा! बॅटिंगसह बॉलिंगचाही सराव
डावखुरा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा सराव सत्रात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यासोबत दीर्घ चर्चा करताना दिसून आले. फलंदाजीसह त्याने बराच वेळ गोलंदाजीचा देखील सराव केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो गेम प्लॅनचा भाग असेल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
तीन सामन्यात झिरो ठरलेला अभिषेक शर्मा सुपर ८ मध्ये हिरो ठरणार का?
अभिषेक शर्मा हा मोठ्या फटकेबाजीसह संघाच्या डावाला धमाकेदार सुरुवात करुन देण्यासाठी ओळखला जातो. पण टी-२० वर्ल्ड कपच्या पदार्पणात त्याच्यावर सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. लाजिरवाण्या कामगिरीची कसर तो सुपर ८ मध्ये भरून काढणार का? ते पाहण्याजोगे असेल.
सुपर-८ मधील भारताचे वेळापत्रक