Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला

भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा दोघांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 17:29 IST

Open in App

IND vs SA  3rd ODI South Africa 270 All Out Kuldeep Yadav Prasidh Krishna Picks Four Wickets Each : कुलदीप यादवच्या फिरकीतील जादू आणि प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २७० धावांत ऑलआउट केले आहे. विशाखापट्टणमच्या मैदानात पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावर क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बावुमानं शतकी भागीदारी केली. सलामीवीर क्विंटन डी कॉकनं शतकासह टेम्बा बावुमाच्या उपयुक्त ४८ धावांच्या खेळीशिवाय अन्य कुणालाही  भारतीय गोलंदाजांनी फार काळ टिकू दिले नाही. भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा दोघांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : India vs South Africa: Kuldeep, Krishna shine; SA all out for 270.

Web Summary : Kuldeep Yadav and Prasidh Krishna's stellar bowling performance helped India restrict South Africa to 270 in the third ODI. De Kock's century and Bavuma's 48 were the only notable contributions as Kuldeep and Krishna took four wickets each.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाक्विन्टन डि कॉककुलदीप यादवभारतीय क्रिकेट संघ